28
1) शेळ्यांना लसीकरण करणे अनिवार्य आहे. नेमक्या कोणत्या लसी टोचायला हव्यात या विषयी मतमतांतरे असू शकतात. सर्व साधारणपणे सर्वच लसी टोचून घेणे चांगलंच असते असं बहुतेक जण मान्य करतील. मी माझ्या शेळ्यांना फक्त et, hs व ppr या तीनच लसी टोचत असतो. बाकीच्या लसी नाही टोचल्या तरी चालते असं माझं मत झालं आहे. माझ्या या मतास दुजोरा देणारे व एवढ्याच लसी टोचणारे काही शेळी पालक आहेत.
2) लस म्हणजे काय? हा प्रश्न आता सर्वसाधारण झाला आहे. एक तर रोग निर्माण करणारया सूक्ष्म जीवाचे अकार्यक्षम रूप किंवा त्याच्या मृत पेशी त्या लसीमध्ये असतात दुसर म्हणजे रोग निर्माण करणारा सूक्ष्मजीव प्राण्याच्या शरीरात काही विकर किंवा ऍन्टीबॉडीझ सोडत असतात; लसीमध्ये असे कृत्रिम विकर किंवा ऍन्टीबॉडीझ असतात.
3) जेंव्हा आपण लसी टोचतो तेंव्हा शेळीच्या शरीरातील पांढऱ्या पेशींना रोग निर्माण करणाऱ्या सुक्षमजीवांची किंवा त्यांच्या द्वारे सोडल्या जाणाऱ्या विकारांची कल्पना येत असते,; जेंव्हा केंव्हा प्रत्यक्षात त्या रोगाचे सूक्ष्मजीव शेळीच्या शरीरात प्रवेश करतात तेंव्हा तिच्या शरीरातील पांढऱ्या पेशींकडे त्या सुक्षमजीवविरुद्ध लढण्याची रणनीती व आयुधे तयार असतात. या पूर्वसज्जतेलाच आपण रोगप्रतिकार शक्ती असे आपण म्हणतो.
4) fmd हि लस ऑइल इमर्सड स्वरूपात येते त्यामुळे ती मांसात टोचावी लागते. कातडी खाली टोचल्यास त्या जागी गाठ निर्माण होते. हि लस घट्ट असते त्यामुळे लसीकरण करताना जनावरास त्रास होत असतो. बाकी सर्व लसी वेगवेगळ्या पातळ मीडिया मध्ये येत असतात आणि त्या कातडी खाली टोचाव्या लागतात. त्यांनी काही त्रास होत नाही.
5) माझ्या माहिती प्रमाणे सर्वच लसी गाभण, विलेल्या तसेच 2 महिण्यापुढील शेळ्यांना आपण टोचू शकतो. काही अडचण येत नाही 6) आतापर्यंत मी सरकारी व खाजगी दवाखान्यातू विकत घेऊन किंवा मोफत वेगवेगळ्या कंपनीच्या वेगवेगळ्या रोगांसाठीच्या लसी गेली किमान 10 -15 वर्ष आमच्या मेंढरास टोचत आहे. मला आत्तापर्यंत कोणत्याही लसीचा बाटलीवर (व्हायल) 'गाभण जनावरास हि लस टोचू नये' असे निर्देश आढळले नाहीत.
7) शेळ्यांना लस टोचली म्हणजे आपण निश्चिन्त होऊ शकत नाही. त्याचे कारण असे कि लस टोचल्याने रोग येण्यास प्रतिबंध होत नाही तर त्या रोगविरुद्ध लढण्याची रोग प्रतिकारक्षकती तयार होते. आता रोग प्रतिकार शक्ती तयार झाली म्हणजे रोग येणार नाही असे होत नाही. माझ्या मेंढरांचे उदाहरण मी येथे देईन. सन 2000 सालच्या आसपास आमच्या मेंढरात लाळ्या खरकुत म्हणजे fmd हा विषाणू जन्य रोग आला होता. तेंव्हा या रोगविषयी आम्हाला अजिबात माहिती नव्हती, साहजिक लसीकरण हि केले नव्हते. त्या एका वर्षात म्हणण्यापेक्षा एक दोन महिन्यात आमचे खूप मोठे नुकसान fmd ने केले. हा रोग चांगल्या तंदुरुस्त धडधाकट मेंढ्याना येतो. मेंढी लवकर मरत नाही, किमान या 8-10 दिवस ती जगते, पण या दिवसात सुरवातीला तिला खाता पिता येत नाही व नंतर चालताही येत नाही. तेंव्हा मेंढ्या फिरस्तीवर असतात, रोज दुसऱ्या गावाला जावं लागत, अश्या वेळेला या न चालनार्या व न खाणाऱ्या मेंढ्यांच्या मोठाच उपद्व्याप असायचा. कितीक किलोमीटर अंतर अश्या आजारी मेंढ्या खांद्यावर उचलून मेंढ्यांबरोबर वागवाव्या लागायच्या. संध्याकाळी पुन्हा त्यांना लुसलुशीत चारा आणून स्वतःच्या हाताने एक एक घास भरवून चारावं लगे. जीव नकोसा व्हायचा. शेवटी अशक्त पणाने मेंढ्या मरायच्या, काहींना जागेवरच सोडून पुढच्या गावाला निघून जावं लागे. नुकसान तर व्हायचंच पण अतोनात कष्ट उपसावे लागे.
त्यानंतर च्या वर्षी आम्ही इंटेरवेट
कंपनीची लस आणून टोचली. . मग साधारण त्यावेळेला आमच्याकडे 250 पेक्षा जास्त मेंढ्या होत्या. लस तोचल्यानन्तर साधारण 20 एक मेंढ्याना महिन्या दीड महिन्याच्या कालावधीनंतर लाळ्या खरकुत ची लागण झाली. पण या वेळेला मेंढ्या त्या मनाने लवकर बऱ्या व्हायच्या. तोंडाला लाळ यायची पण पायात रोग उतरत नसायचा. पुढच्या वर्षी लस तोचल्यानन्तर रोग येण्याचं प्रमाण अगदीच कमी झाले. आणि fmd ची भीती कमी झाली. त्यांनतर आम्ही बरीच वर्ष fmd ची लस न चुकता देत असू, त्या रोगाचे प्रमाण व नुकसान करण्याची क्षमता कमी झाली. हे लक्षात अल्यांनंतर आम्ही जेंव्हा मेंढ्याना प्रत्यक्ष fmd ची लागण होते तेंव्हाच fmd ची लस टोचू लागलो. गेली 2-3 वर्ष आम्ही fmd ची लस मेंढ्याना दिली नाही.
8) लस टोचल्याने त्या रोगविरुद्ध लढण्याची त्या शेळीची क्षमता वाढते, परंतु रोग त्या शेळीला होणार कि नाही हे त्या रोगाचा किती प्रादुर्भाव झाला, किती इनाकुलम आहे, वातावरण कसे आहे, शेळीची तब्यत कशी आहे या सर्व बाबींवर अवलंबून आहे. ती लस टोचून किती दिवस झाले हे देखील महत्वाचे आहे.
9) कळपातील सर्व शेळ्यांना एकाच वेळी लसीकरण करणे हिताचे आहे. समजा गाभण शेळ्या वगळून लसीकरण केले व त्यातील एखाद्या शेळीला तो रोग झाला तर तुमच्या कळपत त्या रोगाचा इनकुलम वाढलाच म्हणून समजा. म्हणजेच इतर लसीकरण केलेल्या शेळ्यांना देखील रोग होण्याची शक्यता वाढते.
10) जसे एखाद्या औषधाला वेगवेगळा शेळ्या वेगवेगळा रिस्पॉन्स देतील तसेच लसीकरणाची परिणामकारकता वेगवेगळ्या शेळ्यांसाठी वेगवेगळी असेल.
11) माणसांचा गोवर व शेळ्यांचा मावा हे रोग म्हणजे लसीकरणाची नैसर्गिक उत्तम उदाहरण आहे. परंतु या रोगांची एकदा लागण झाली व त्यातून माणूस व शेळी बरी झाली कि पुन्हा त्यांना जीवनभर हे रोग होत नाहीत अस
आपण ऐकतो. शेळ्यांच्या बाबतीत बाकीच्या रोगांसाठी आपल्याला साधारण दर सहा महिन्याला लसीकरण करण्याची शिफारस केली जाते. बहुदा या रोगांविषयी जी माहिती शेळीच्या शरीराने साठवून ठेवायला हवी ती राहत नसावी.
बाळू मोटे बारामती

No comments:
Post a Comment