Friday, February 22, 2019

                                                                             Chitra-3


पोस्ट 3

ब्रीडिंग साठी सर्वोत्कृष्ट शेळी कशी निवडायची?

1) पोस्ट 1 व 2 मध्ये आपण शेळ्यांच्या वजनाच्या विश्लेनावरून व जुळे देण्याचे प्रमाण तसेच एकूण मांस उत्पादनातील त्या शेळीचा वाटा या वरून त्यांची क्रमवारी ठरवली होती.
2) चित्र 3 मध्ये आत्तापर्यंत केलेल्या क्रमवारी त्यांच्या आहे त्या क्रमाने एकाखाली एक मांडून त्यांना गुण दिले आहेत. चढत्या क्रमाने शेळ्याची मांडणी असेल तर गुणही चढत्या क्रमाने दिले आहेत. शेळ्याची मांडणी जर उतरत्या क्रमाने असेल तर गुणही उतरत्या क्रमाने दिले आहेत.
3) चित्र क्रं 3 मध्ये दाखवल्या प्रमाणे सर्व गुणांची बेरीज करून तळाशी मांडली आहे. आलेल्या बेरजेवरून गुणानुक्रम काढण्यासाठी उतरत्या क्रमाने मांडणी केली आहे. या पद्धतीने C,A,D,B,E असा गुणानुक्रम मिळतो. 
4) या अंतिम गुणानुक्रमा प्रमाणे C शेळी हि कळपातील सर्वोत्कृष्ट शेळी आहे. तसेच A व D या देखील चांगल्या शेळ्या आहेत परंतु B व E या शेळ्या कळपातून काढून टाकणे श्रेयस्कर होईल.
5) C शेळीच्या पाठी ठेवणे चांगले तसेच तिच्या पासून जन्मलेला बोकड लागवडीसाठी सांभाळणे योग्य राहील.
6) कळपाच्या एकूण संख्येच्या 20 टक्के शेळ्या निवडताना या गुणानुक्रमाचा विचार करून चांगल्या गुणवान शेळ्या निवडाव्यात.
7) आपल्या कळपातील शेळ्यांची तुलना दुसऱ्या कळपातील शेळ्यांशी करता येत नाही.
8) शेळ्यांच्या नोंदी वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात. त्याप्रमाणे डेटा प्रोसेस करण्याच्या पद्धती बदलत असतात.

टीप:- स्थानिक जातीच्या शेळ्यांचे पालन करणाऱ्या शेळीपालकांनी या उदहरणांचा जरूर विचार करावा. काही अडचण वाटत असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. माझी काही मदत लागल्यास आपण टेलिग्राम व व्हाट्स ऍप वर संपर्क साधू शकता. शेळी पालनासंबंधी या स्वरूपाचा डेटा प्रोसेस करण्यासंदर्भात माझी काही मदत हवी असल्यास संपर्क साधावा. 

या माहितीचा येथेच शेवट करतो. या विषयी आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे. 
धन्यवाद.

3 comments:

  1. Sir नमस्कार वरच्या तक्त्या वरुण
    Ji शेली माध्यम वजानाची आहे आणि jiche जुड़े देण्याचे प्रमाण चांगले असेल तिची मास उत्पादन जास्तच असणार
    पण तिला दूध चांगले असायला पाहिजे.🙏

    ReplyDelete
    Replies
    1. दूध असणे हे महत्वाचे आहेच, पण आपण रेकॉर्ड मध्ये किंवा शेळीची निवड करताना सर्व गुणधर्म घेऊन चालत नाही. मोजकेच 2-3 गुणधर्म घ्यावे लागतात

      Delete
  2. पोस्ट 1 व 2 नाही वाचली अजुन 🙏🙏

    ReplyDelete