उस्मानाबादी व बोअर शेळी-
१) सोबत च्या चित्रात एका प्रथित यश बोअर शेळी पालकाने बोअर व उस्मानाबादी शेळीची तुलना केली आहे, हे pdf ऑनलाइन उपलब्ध आहे.२) कोणत्याही दोन गोष्टींची तुलना करताना त्यांना एकाच वातावरणात म्हणजे एकसारखीच ट्रीटमेंट देऊन मग करायला हवी. पारंपरिक पद्धतीच्या उस्मानाबादी शेळी ची तुलना बंदिस्त बोअर शेळीशी केली तर चुकीचे ठरेल.
३) तुलना करताना उस्मानाबादी व बोअर शेळीला एकसारखेच खाद्य व खुराक देणे आवश्यक आहे, तेंव्हाच खरी तुलना होऊ शकते. बंदिस्त पद्धतीत उस्मानाबादी शेळीची किमान 3 ऱ्य 4थ्या पिढीनंतर तुलना करायला हवी. तसेच अनुवांशिक गुणधर्माच्या बाबतीत बोअर शेळी होमोजिनियस असते, तेंव्हा तुलना करण्यासाठी उच्च अनुवांशिक गुणधर्म असलेली उस्मानाबादी शेळ्यांचा कळप निवडायला हवा.
४) तुलना कमीत कमी दोन्ही शेळीच्या 5 वितांची करायला हवी.
५) सोबत च्या चित्रात फक्त वजन वाढीची तुलना केली आहे.
६) जुळे देण्याचे प्रमाण, व एका शेळी पासून मिळणारे एकूण मांस उत्पादन, शेळी ची रोग प्रतिकार शक्ती, fcr, गाभडण्याची प्रमाण, करडांची मरतुक इ बाबी तुलना करण्यासाठी विचारात घेणे आवश्यक आहे.
७) आज रोजी जुळे देण्याच्या बाबतीत उस्मानाबादी शेळी बोअर पेक्षा व इतर भारतीय शेळी पेक्षा सर्वोत्तम आहे. जुळे मिळाले तरच शेळी पालन परवडते हा माझा अनुभव आहे.
८) बहुदा स्थानिक व उस्मानाबादी शेळ्या कश्या कमी प्रातिच्या आहेत व विदेशी शेळ्या कश्या उच्च प्रतीच्या आहेत असे दाखवून दिशा भूल केली जाते कि काय?
९) बोअर हि जगातील सर्वोत्तम मांसल व जास्त वेगाने वाढणारी शेळी आहे हे जगमान्य आहे, हे मी मान्य करतो. परंतु म्हणून भारतीय स्थानिक शेळ्या व उस्मानाबादी उत्पादनाच्या बाबतीत हलक्या ठरत नाहीत.
--- बाळू मोटे, बारामती. (9422512680)
No comments:
Post a Comment