Friday, February 22, 2019

क्रॉस ब्रीडिंग केल्यानंतर तयार होणाऱ्या पिढीमध्ये माता पित्याच्या अनुवंशिकतेची सरासरी येते हा जेनेटिक शास्त्राचा सिद्धांत आहे. हे मी पाठीमागील वेगवेगळ्या विवेचनात नमूद केले आहे.

त्याची पुष्टी करण्यासाठी खाली उदाहरण देत आहे.

आपल्याकडील वेगवेगळ्या जातींच्या शुद्ध देशी गाईंचे दूध उत्पादन 3 ते 10 लिटर प्रति दिवस असे आहे. हे दूध उत्पादन वाढवण्यासाठी जर्सी व hf या गायीचं संकर आपल्याकडील देशी गाईंवर करण्यात आला. 20 लिटर प्रति दिवस दूध देणाऱ्या शुद्ध जर्सी चा क्रॉस देशी गाईंवर केल्यावर आपल्याकडील क्रॉस ब्रीड जर्सी 8 ते 10 लिटर प्रति दिवस तसेच 25 लिटर प्रति दिवस दूध देणाऱ्या शुद्ध hf गाईंचा आपल्याकडील देशी गाईंवर क्रॉस केल्यानंतर तयार झालेल्या hf क्रॉस ब्रीड चे दूध उत्पादन 10 ते 15 लिटर प्रति दिन एवढे वाढले.

या वरून हे सिद्ध होते कि क्रॉस ब्रीडिंग केल्यानंतर तयार होणाऱ्या जातीत माता पित्याच्या अनुवांशिक गुणधर्माची सरासरी येते. तेंव्हा तुमच्याकडील शेळ्यांची अनुवंशिकता माहिती असल्याशिवाय क्रॉस ब्रीडिंग करू नये असे मला वाटते.

No comments:

Post a Comment