FAQ...4
बंदिस्त शेळीस खुरकामध्ये सोयाबीन बी देने योग्य आहे का व किती प्रमाणात द्यावे?
उत्तर:-
१) सोयाबीन बी मध्ये भरपूर क्रूड प्रोटीन म्हणजे प्रथिने असतात. सुमारे 30 टक्के प्रथिने असतात. या मुळे सोयाबीन शेळ्यांसाठी उत्तम खुराक घटक आहे, परंतु सोयाबिन बी शेळ्यांना खाऊ घालण्यात बऱ्याच अडचणी आहेत.
२) सोयाबीन बी मध्ये काही अँटी नुत्रीशनल घटक असतात ज्याच्या मुळे सोयाबीन खुराक म्हणून देऊन देखील आपणास हवा तो फायदा मिळत नाही. शेळीच्या शरीरात प्रोटीन बनविण्याची जी प्रक्रिया चालते त्या प्रक्रियेत सोयाबीन बी मधील प्रोटीन इनहीबिटर नावाचे घटक ज्यास ट्रिपसिंन इनहीबिटर असेही म्हणतात ते बाधा आणतात व त्यामुळे शेळीस प्राणिजन्य प्रथिनांची पुरेशा प्रमाणात निर्मिती करता येत नाही.
३) हे टाळण्यासाठी सोयाबीन बी भाजून शेळीस खाऊ घालणे असा शास्त्रीय पर्याय आहे. आपण जसे हरभरे भाजून खातो तसे सोयाबीन तव्यावर किंवा मोठ्या कढईत भाजावे व थंड झाल्यावर खुराक म्हणून शेळ्यांना आपण खाऊ घालू शकतो.
४) सोयाबीन बी मध्ये फायटोइस्ट्रोजन नावाचा आणखी एक घटक असतो ज्या मुळे शेळ्या गाभडू शकतात. म्हणून मोठ्या प्रमाणात सोयाबीन बी शेळ्यांना खाऊ घालणे विशेषतः गाभण काळात हे धोक्याचे आहे.
५) एका 40 किलो वजनाच्या शेळीस 50 ते 100 ग्राम भाजलेले सोयाबीन बी खाऊ घालू शकतो. शेळीस कोणता चारा व इतर खुराक दिला जात आहे त्यावर त्या शेळीस किती सोयाबीन बी खाऊ घालायचे हे ठरवावे लागते.
६) सोयाबीन बी पेक्षा सोयाबीन मिल किंवा सोयाबीन पेंड जास्त योग्य आहे, या मध्ये 40 टक्के पर्यंत क्रूड प्रोटीन म्हणजेच प्रथिने असतात. सामान्य शेतकऱ्यास सोयाबीन पेंड मिळणे थोडे अवघड जरी असले तरी सोयाबीन बी पेक्षा सोयाबीन पेंड नक्कीच जास्त लाभदायक आहे. असे असले तरी सोयाबीन पेंड किंवा सोयमिल गाभण शेळीस वापरणे जास्त योग्य नाही.
७) सोयाबीन पेंडीचा करडांच्या वजन वाढीमध्ये शेंगदाणा पेंडीपेक्षा जास्त चांगला फायदा झाल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे. ईद चे बोकड व विक्री साठी ठेवलेली करडे यांस सोयाबीन पेंड अवश्य वापरावी.
- सौजन्य- शेळ्यांचे आहारशास्त्र ग्रुप, संकलन - बाळू मोटे, बारामती.
सर मी तर गाभण काळात शेळीला खुराक सोयाबीन व मका देतोय असं काही आढळून आले नाही 🙏
ReplyDeleteमला तर सोयाबीन मध्ये भरपूर प्रोटीन आहे असं वाटलं मी लहान पिल्ले व मोठ्या बोकडांला सोयाबीन देतो वजन वाढण्यासाठी भरपूर मदत होते पिल्लांच्या अंगावर ची कांत सुध्दा चमक मारती वजन वाढण्यासाठी बेस्ट खुराक आहे ♥️🙏
ReplyDeleteसर तर तुम्हाला माहिती असणं सोयाबीन निच तेल किती माहाग आहे आणि सोयाबीन निचा भुसा किती आवडीने खातात शेळ्या आणि सोयाबीन पासून वडा बनतो सगळ्यात जास्त सोयाबीन टॉवर आहे जर मी काही चुकीचे बोललो असणं तर मला माफ करा 🙏😔 7744993072 खूप छान माहिती देतात साहेब तुम्ही मनापासून आभार 🙏🤝❤️
ReplyDelete