FAQ...10
बंदिस्त शेळ्यांना खुराक म्हणून गहू देने योग्य आहे का?
उत्तर:-
१) शेळ्यांचे आहारशास्त्र या व्हाट्स अप समूहात या विषयावर अनेक वेळा चर्चा झाली आहे. या विषयी अनेक तज्ञ शेळीपालकांनी शेळ्यांना गहू खुराक म्हणून देण्याविषयी आपापली मते व्यक्त केली आहेत.
२) गहू हे एक खुरकाच्या दृष्टीने विशिष्ट वैशिष्ट्ये असलेले तृणधान्य आहे ज्यात क्रूड प्रोटीन जवळपास 12 टक्के व tdn 80 टक्के आहे. गहू बियातील प्रथिने पचण्यास सोपी असतात व त्यांचा शरीर बांधणीसाठी चांगल्याप्रकारे उपयोग होतो. गव्हातील ग्लूटेन खूप उपयुक्त आहे. गव्हातून मिळणारी प्रथिने व उपलब्ध होणारी ऊर्जा यांचे एक विशिष्ट गुणोत्तर आहे त्या मुळे गहू इतर तृणधान्य वर्गीय खुराक घटकापेक्षा पचवण्यास सोयीस्कर आहे.
३) गव्हाच्या अश्या चांगल्या गुणधर्मामुळे शेळ्यांना गहू खाऊ घातल्यास त्यांची तब्येत लवकर सुधारते व त्यांचा BCS म्हणजे बॉडी कंडिशन स्कोर वाढतो. म्हणून तब्येतीने खराब झालेल्या शेळ्यांना जर सुधाराव्याचे असेल तर त्यांना गहू खाऊ घालणे हिताचे आहे.
४) सर्वसाधारण शेळ्यांना एका त्यांच्या खुरकाच्या गरजेपेक्षा जास्त गहू खाऊ घातल्यास त्यांचा BCS प्रमाणापेक्षा जास्त वाढतो परिणामी त्या लागवड होण्यास त्रास देतात.
५) बऱ्याच शेळीपालकांची मत असे आहे की गहू खाऊ घातल्याने शेळ्या लवकर गाभ जात नाहीत किंवा वारंवार उलतातत.
६) सर्व शेळ्यांच्या बाबतीत वरील प्रमाणे अडचण येईलच असा दावा करता येत नाही. त्या मुळे गहू खाऊन देखील काही शेळ्या उत्तम प्रकारे त्यांचे पुनरुत्पादन चक्र मेंटेन करतात.
७) एका 40 किलो वजनाच्या शेळीस 100 ते 150 ग्राम पर्यंत गहू देता येऊ शकतो. शेळी विल्यानंतर गहू चालू केल्यास नक्कीच दूध उत्पादनात वाढ होते.
८) गहू खुराक म्हणू न द्यायचा असेल तर 50 ग्राम पासून सुरवात करावी. हळू हळू गव्हाची मात्रा वाढवत जावी. अचानक व एकदम जास्त गहू खाल्ल्यास असिडोसिस नावाचा आजार होतो व लवकर व योग्य उपचार न मिळाल्यास शेळी तात्काळ मृत्युमुखी पडते.
- सौजन्य- शेळ्यांचे आहारशास्त्र ग्रुप, संकलन - बाळू मोटे, बारामती.
बंदिस्त शेळी पालनाची संपूर्ण माहिती, अनुभव व शास्त्रीय माहिती व त्याचे विश्लेषण. चारा, खुराक, शेलयांची पैदास, रेकॉर्ड, जमा खर्च रोग निदान औषध उपचार. Stall feed Goat farming in Marathi. All about goats, feeding, breeding and housing of goats.
Thursday, October 15, 2020
FAQ...10
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment