स्वयंरोजगार निर्मितीसाठी परसदारातील कोंबडीपालन हा चांगला रोजगार
आहे. या व्यवसायापासून सतत वर्षभर उत्पन्न मिळण्याची संधी असते. परसदारातील
कोंबडीपालनाकरिता वनराजा जातीच्या संकरीत कोंबड्यांचा उपयोग करणे आर्थिकदृष्ट्या
फायदेशीर ठरते.
वनराजा कोंबडीची वैशिष्ट्ये –
- गावठी कोंबड्यांप्रमाणे विविध रंगांत आढळतात.
- कोणत्याही वातावरणात विशेषतः दुष्काळी परिस्थितीत व जिरायत वातावरणात एकरूप होतात.
- रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते.
- मांस भरपूर (74 टक्के) प्रमाणात मिळते व चविष्ट असते. (आठ आठवड्यांत सुमारे एक किलो) या कोंबडीला एक किलो वजनासाठी 2.6 किलो खाद्य द्यावे लागते.
- वर्षाकाठी 160 ते 180 अंडी मिळतात. अंड्यांचे वजन ५३ ग्राम व रंग तपकिरी असतो.
- या कोंबडीचा वयात येण्याचा कालावधी 166 दिवसांचा आहे.
- अंड्यांतून सशक्त पिल्ले जन्माला येतात. सफल अंड्याचे प्रमाण ८७ टक्के आहे.
- वनराजा जातीच्या कोंबड्या अडीच ते तीन वर्षे सतत अंडी देतात. खुडूक बसत नाहीत.
सुरवातीला एक- दोन दिवस भरडलेला मका
द्यावा. त्यानंतर चार आठवडे स्टार्टर खाद्य द्यावे. नंतरचे चार आठवडे फिनिशर खाद्य
द्यावे. सरासरी एका पक्ष्याला मोठे होईपर्यंत (आठ आठवड्यांचे) 2.6 किलो खाद्य द्यावे.
कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे वनराजा
जातीची १ महिने वयाची पिल्ले विक्रीस उपलब्ध असतात.
संपर्क- डॉ. जाधव आर.एस.- ९४२२५१९१९३
संपर्क- डॉ. जाधव आर.एस.- ९४२२५१९१९३
वनराजा कोंबडी |
या ब्लॉगवरील सर्व माहिती शास्त्रीय ज्ञानावर
आधारित असून प्रादेशिक हवामान व इतर नैसर्गिक साधनसामुग्रीतील वैविध्यामुळे या
माहितीची परिणामकारकता विविध भागात भिन्न असू शकते. शेतकऱ्यांनी या ब्लॉगवरील
माहितीचा उपयोग स्वतःच्या जबाबदारीवर करावा. कोणत्याही परिणामाकरिता लेखक जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
No comments:
Post a Comment