Tuesday, April 2, 2013

अग्री क्लिनिक अग्री बिझनेस मॅनेजमेंट

केंद्र सरकारच्या कृषी विभागांतर्गत मॅनेज हायद्राबाद या संस्थेच्या माध्यमातून अग्री क्लिनिक अग्री बिझनेस मॅनेजमेंट हा कोर्स सन २००२-०३ सालापासून सुरु झाला.

महाराष्ट्रामध्ये विविध संस्थांच्या माध्यमातून हे प्रशिक्षण दिले जाते. कृषी  विज्ञान केंद्र बारामती येथे देखील हा कोर्स चलवला जातो.

हा कोर्स पूर्ण केल्यावर मिळणा-या प्रमाणपत्राच्या आधारावर प्रशिक्षणार्थींना राष्ट्रीयकृत बँकेकडून २० लाखापर्यंत कर्ज मिळू शकते. यासाठी नाबार्ड मार्फत ४४ टक्के अनुदान महिला आणि एससी, एसटी विद्यार्थ्यांना तसेच ३६ टक्के अनुदान इतरांना मिळते.

पहिल्या कर्जाची परतफेड केल्यानंतर पुन्हा २० लाख रुपयापर्यंत कर्ज मिळू शकते. त्यासाठी तेवढेच अनुदान मिळते.

हे कर्ज व अनुदान फक्त कृषी क्षेत्राशी निगडीत व्यवसाय करण्याकरिता दिले जाते.

या प्रशिक्षणाकरिता कृषी पदवीधर, पदविकाधारक, दुग्ध व्यवसाय पदविकाधारक व पदवीधर इत्यादींना प्रवेश घेता येतो.

हा कोर्स २ महिने कालावधीचा आहे. त्यासाठी फक्त ५०० रुपये फी आकारली जाते.

या कोर्ससाठी कृषी विज्ञान केंद्रात नाव नोंदणी केली जाते. नावनोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखतीनंतर एका बचसाठी ३५ विद्यार्थी निवडले जातात.

प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांना यशस्वी उद्योजक बनण्यासाठी आवश्यक असणारे गुण कृषी विषयक व्यवसायांची माहिती, व्यवसायाभिमुक प्रशिक्षण आणि यशस्वी व्यवसायिकांच्या उद्योगांना भेटी आयोजित केल्या जातात. त्यांमध्ये व्यवसायाची गोडी निर्माण केली जाते.

नंतरच्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांना आपला व्यवसाय निवडण्यास सांगितले जाते. यशस्वी उद्योजकांना मार्गदर्शनासाठी बोलावले जाते. उद्योगासाठी परवाना मिळण्यापासून ते विक्री व्यवस्थेपर्यंतचे सर्व बारकावे सांगितले जातात.

विद्यार्थ्यांनी निवडलेल्या व्यवसायाच्या प्रशिक्षणासाठी १५ दिवस त्यांना त्या स्वरूपाच्या व्यवसायीकांकडे पाठविले जाते. या १५ दिवसांमध्ये व्यवसायाच्या ठिकाणी स्वतः काम करायचे असते. यावेळेला कामातले बारकावे लक्षात येतात. कच्चामाल खरेदी, साठवण, प्रक्रिया, ग्राहकाची मानसिकता, डीलर लोकांशी संवाद, जमा खर्चाचे गणित यांची माहिती मिळते.

विद्यार्थ्यांनी निवडलेल्या व्यवसायाचा प्रकल्प अहवाल करून कागदपत्रांच्या तपासणीनंतर सबंधीताला कर्ज मिळते. सहा महिन्यामध्ये नाबार्ड मार्फत अनुदान मिळते.

संपर्क- योगेश पाटील- ९४२१७८८३४८. ०२११२ २५५२०७.


या ब्लॉगवरील सर्व माहिती शास्त्रीय ज्ञानावर आधारित असून प्रादेशिक हवामान व इतर नैसर्गिक साधनसामुग्रीतील वैविध्यामुळे या माहितीची परिणामकारकता विविध भागात भिन्न असू शकते. शेतकऱ्यांनी या ब्लॉगवरील माहितीचा उपयोग स्वतःच्या जबाबदारीवर करावा. कोणत्याही परिणामाकरिता लेखक जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

No comments:

Post a Comment