वाढत्या लोकसंखेस अन्नधान्याची तसेच दुध, मांस, मासे इ. गरज भागविण्याकरिता शासन, शास्त्रज्ञ व शेतकरी यांचे नेहमीच प्रयत्न सुरु असतात.
दुध हा आपल्या आहारातील वगळता न येणारा घटक आहे.
स्वच्छ दुधाचे उत्पादन, त्याची ग्राहकास कमी किमतीत उपलब्धता हे कळीचे मुद्दे असून त्यासाठी अनेक स्तरावर प्रयत्न चालू असतात.
पारंपारिक दुग्ध व्यवसाय करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही असे अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे असते.
हा व्यवसाय आधुनिक पद्धतीने केला तर निश्चित फायदेशीर ठरतो.
या साठी आवश्यक प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे उपलब्ध आहे. या प्रशिक्षणात खालील मुद्दे प्रामुख्याने प्रात्यक्षिक ज्ञानासह शिकविले जातात-
- जनावरांचे आहार व्यवस्थापन
- मुरघास तयार करणे.
- मुक्त संचार पद्धतीचा गोठा व त्याचे व्यवस्थापन
- जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन.
- जनावरांच्या योग्य जातीची निवड
- विविध शेतकऱ्यांच्या गोठ्यास प्रत्यक्ष भेटी.
- दुग्ध प्रक्रिया
- प्रकल्प अहवाल तयार करणे.
कृषी विज्ञान केंद्रात प्रशिक्षणासाठी आवश्यक सर्व सोई सुविधा उपलब्ध आहेत. यामध्ये प्रामुख्याने मुक्त संचार पद्धतीचा गोठा, दुध काढन्याचे यंत्र, खरारा यंत्र, मुरघास, विभाग निहाय क्षार मिश्रण, प्रशिक्षण हॉल, राहण्याची व जेवणाची सोय इ.
संपर्क- डॉ. जाधव आर. एस. ९४२२५१९१९३,
कृषी विज्ञान केंद्र बारामती-०२११२ २५५२०७, २५४७०७.
www.kvkbaramati.com.
मुक्त संचार पद्धतीचा गोठा (इस्राइल पद्धत) |
![]() |
खरारा यंत्र |
चारा टाकण्यासाठी यंत्राचा उपयोग |
![]() |
सहभागी प्रशिक्षणार्थी |
या ब्लॉगवरील सर्व माहिती शास्त्रीय ज्ञानावर
आधारित असून प्रादेशिक हवामान व इतर नैसर्गिक साधनसामुग्रीतील वैविध्यामुळे या
माहितीची परिणामकारकता विविध भागात भिन्न असू शकते. शेतकऱ्यांनी या ब्लॉगवरील
माहितीचा उपयोग स्वतःच्या जबाबदारीवर करावा. कोणत्याही परिणामाकरिता लेखक जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
मला दुध व्याव्सायची माहिती पाहिजे
ReplyDeleteमला दुध व्याव्सायची माहिती पाहिजे
ReplyDelete