Saturday, July 13, 2019

29

आत्रट उपाय

1) दिं 12 नोव्हेंबर 17 रोजी चा एक किस्सा, जो मला बरेच शिकवून गेला. त्या दिवशी माझ्या आईने मेंढ्याना मीठ खाऊ घातले होते.
2) साधारण या दिवसात मेंढ्या माती खात असतात, त्यांना क्षारांची कमतरता असते; यावर उपाय म्हणून ज्या वर्षी माती खाण्याचे प्रमाण जास्त असते अश्या वेळेला आई मेंढ्याना मीठ खाऊ घालते.
3) या वेळेला तिने जरा जास्त मीठ ठेवले होते, मेंढ्यानी भरपूर मीठ खाल्ले.
4) 13 तारखेला मला मेंढ्या व कोकरी घेऊन तळेगाव च्या बाजाराला जायचे होते. पहाटे 3 वाजता उठून आम्ही मेंढ्या गाडीत भरायला सुरवात केली.
5) त्या वेळेला एका मेंढीला मिठाची रियाक्षण अली होती. ती मेंढी थरथर कापत होती, तोंडातून पाणी गाळत होती, तिला उठता येत नव्हते. मेंढी मरण्याची शक्यता जास्त वाटत असल्याने आम्ही तिला बाजारात विकून टाकण्याचा निर्णय घेतला.
6) 13 तारखेला सकाळी 9 वाजता मेंढरकडून आमच्या मावशीने  फोन करून सांगितले कि 4 मेंढ्याना तशीच रियाक्षण आली आहे. या वेळेला आम्ही बाजारात होतो. माझे व माझ्या आईचे टेन्शन त्यामुळे खूप वाढले. आणखी 10 वाजता फोन आला कि आणखी दोन मेंढयाना त्रास सुरु झाला आहे.
7) साधारण 200 मेंढ्यानी मीठ खाल्ले होते. हळू हळू रियाक्षण यायला सुरवात झाली होती. आम्हा दोघा माय लेकराच्या पायाखालची माती सरकली होती. आता काय करायचे एवढ्या सगळ्या मेंढयाना जर रियाक्षण अली तर त्यांना त्यातून कसे वाचवायचे...!
8) आम्ही बाजार आटोपून शिक्रापूर मध्ये आलो. त्यावेळला फोन आला व मावशीने सांगितले कि मेंढ्या जास्त पाणी पीत आहेत.
9) आम्ही नारायणगाव येथील एक शेळ्या मेंढ्यांचे तञ् आहेत त्यांना फोन केला व झालेला प्रकार सांगितला. त्यांनी प्रथम धीर दिला व सांगितले कि काही घाबरून जाऊ नका व शांत डोक्याने निर्णय
 घ्या. त्यांनी ऍट्रोपीन व cpm म्हणजे क्लोरोफिनारामाईं म्यॅलेट हि इंजेक्शने प्रत्येक मेंढीला टोचायला सांगितली. मला हा उपाय काही पटला नाही. शिक्रापूर मधील एका मेडिकल मध्ये जाऊन आम्ही काही उपाय मिळतोय का ते शोधायला गेलो. तेथील फार्मासिस्ट चांगला माणूस, त्याने सहानुभूतीपूर्वक आमची समस्या समजून घेतली व त्यांच्या ओळखीच्या एका तञ् पशुवैद्यक डॉक्टरांना फोन करून विचारून घेतले- त्यांनी सांगितले कि ज्या मेंढयाना रियाक्षण अली त्यांना ब्रोटोन व प्रोबायोटिक पावडर पाजावी. हा देखील उपाय मला पटला नाही व त्या फार्मासिस्ट ने ती दिलेली औषधे मी नाकारली. त्या फार्मासिस्ट ने आणखी एका तज्ञास विचारले व त्यांनी रियाक्षण आलेल्या मेंढयाना ताक व कोळसा पावडर पाजण्याचा सल्ला दिला. हा उपाय देखील मला काही पटेना.
9) फोन वरून तञ् तेवढा व्यवस्थित सल्ला देतात किंवा देऊ शकतात या बद्दल मी नेहमीच साशंक असतो. प्रत्यक्ष पेशंट पाहून योग्य सल्ला देता येतो यावर माझा विश्वास आहे.
10) पहाटे 3 वाजता ज्या मेंढीस रियाक्षण अली ती बद्दल फार काही वाटत नव्हते, पण तेंव्हा पासून जर हि मिठाची रियाक्षण असेल तर काय करायला हवे याबद्दल माझ्या डोक्यात विचार सुरु झाले होते. 9 वाजता आजारी मेंढ्या ह्या मिठामुळेच आजारी आहेत यावर आम्ही एकमत झालो होतो.
11) वनस्पती पेशी प्राणी पेशी त्यांचे मेंटबॉलिझम वैगरे सारख्या विषयांचे अभ्यास माध्यमिक व उचमध्यमिक शालांत शिक्षनात असायचे. तेंव्हा तो खरं तर रुटीन अभ्यास होता.
12) सोडियम व पोट्याशीयम हे प्राणी पेशीमध्ये अत्यंत प्रमाणबद्ध असतात, त्यातील एक पेशी भित्तिकेच्या आत व दुसरा बाहेर असतो. एवढा अभ्यास बायॉलॉजि- झूलॉजी मध्ये झाल्याचे आठवले. मीठ खाऊ घातल्याने मेंढ्यांच्या शरीरात सोडियम जास्त झाले असणार व
व त्यामुळे हा सोडियम पोट्याशीयम बॅलन्स बिघडला असणार असं मला वाटत होतं. वाढलेल्या सोडियम ला काउंटर बॅलन्स करण्यासाठी पोटॅशियम मेंढयाना द्यावं लागेल बरोबरच त्यांना पाणी पाजून व लघवी वाटे जास्तीचा सोडियम बाहेर काढावा लागेल या विचारपर्यंत मी आलो होतो.
13) निर्णय घ्यायला उशीर होत होता. लवकरात लवकर ट्रीटमेंट सुरु करायला लागणार होती. किती नुकसान होईल याची नुसती कल्पना केली तरी आम्हाला घेरी येत होती.
14) त्या फार्मासिस्ट ला मी पोट्याशीयम हा घटक असलेलं एखाद इंजेकशन आहे का असं विचारलं. बहुदा त्यांना ते योग्य वाटलं नसेल! थोडा विचार करून त्यांनी पोट्याशीयम क्लोराईड असलेलं 10 मिली अँपुल आणून दिलं. त्याची किंमत होती 24 रुपये.
15) पहिली गोष्ट हि होती कि मी जो ट्रीटमेंट चा विचार करत होतो तो बरोबर आहे का, या बद्दल मी स्वतः शाशंक होतो. दुसरं असं कि मला नुसतं पोट्याशीयम हवं होतं, इंजेकशन मिळालं पोट्याशीयम क्लोराईड चं. आता मेंढीच्या शरीरात दुसऱ्यांदा क्लोराईड जाणार होतं, कदाचित त्यामुळे मेंढयाना दुसरंच काही तरी होऊ नये म्हणजे झालं...!
आणखी एक समस्या होती ती म्हणजे ते पोट्याशीयम क्लोराईड स्लो इन्फुजन या पद्धतीने सलाईन द्वारे द्यायचं होतं. सलाईन मध्ये पुन्हा सोडियम असतो त्यामुळे सलाईन तर लाऊ शकत नव्हतो
. पोट्याशीयम थेट मांसात टोचल्यास किंवा शिरेतून दिल्यास व काही उलटा परिणाम झाल्यास काय करावे...!
थोडक्यात पोट्याशीयम क्लोराईड मेंढयाना टोचणे हि माझ्यापुढे एक रिस्क होती.
16) पोट्याशीयम क्लोराईड ची 3 अँपुल, युनिझाईम आणि लॅसिक्स गोळ्या घेऊन मी परत माघारी फिरण्याचा निर्णय घेतला. वाड्यावर जायला आम्हाला 2 तास लागले. एव्हाना 2 मेंढ्यानी माना टाकून दिल्या होत्या, बाकीच्या दोन बसून होत्या व दुसऱ्या दोन लटपटात चालत होत्या.  आमच्या दृष्टीने चांगली बाब हि होती कि आम्ही परत जाईपर्यंत दुसऱ्या कोणत्या मेंढीला रियाक्षण अली नव्हती.
17) पोट्याशीयम क्लोराईड चे इंजेकशन 4 मिली या प्रमाणे त्या माना टाकलेल्या 2 मेंढयाना टोचले. काय रियाक्षन येते याची सुमारे 15-20 मिनिटे वाट पहिली.
काय आश्चर्य...! त्यानंतर त्यातली एक मेंढी उठून उभी राहिली. नंतर आम्ही उरलेल्या दोघीना इंजेकशन टोचली. त्या मेंढ्या देखील 15 मिनिटात ठणठणीत झाल्या. आम्ही सुटकेचा निश्वास टाकला- माझ्या आईला माझा अभिमान वाटला..!

एव्हाना अचानक मला मी 11 वि बारावीत जे बायोलॉजी झूलॉजी चे जे ज्ञान घेतले त्याचा अभिमान वाटू लागला....!

एक मेंढी मात्र दगावली.

मला नक्की सांगता येणार नाही कि मी केलेल्या उपायांमुळे मेंढ्या ठीक ठाक झाल्या कि आणखी कशामुळे..!
पण मला असं मनापासून वाटत कि पोट्याशीयम रक्तात मिसळलं व सोडियम काउंटर बॅलन्स झाला. त्यामुळे मेंढ्या ठीक झाल्या.

टीप:- मी (बाळू मोटे) केलेला हा उपाय एका विशिष्ट परिस्थितीत केला होता. त्या परिस्थितीत मला बाहेरून कोणतीही मदत मिळण्याची शक्यता नव्हती, आणि जरी मिळाली असती तरी खूप उशिरा मिळाली असती. त्यामुळे जे डोक्यात आले ते तात्काळ करून टाकले. रिस्क घेतली;कदाचित नुकसान देखील झाले असते. तेंव्हा माझी वाचकांना नम्र विनंती कि यातील उपाय करू नयेत, तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या माहितीच्या वापराने आपले कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास त्यास मी कोणत्याही सबबीवर जबाबदार असणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
28

1) शेळ्यांना लसीकरण करणे अनिवार्य आहे. नेमक्या कोणत्या लसी टोचायला हव्यात या विषयी मतमतांतरे असू शकतात. सर्व साधारणपणे सर्वच लसी टोचून घेणे चांगलंच असते असं बहुतेक जण मान्य करतील. मी माझ्या शेळ्यांना फक्त et, hs व ppr या तीनच लसी टोचत असतो. बाकीच्या लसी नाही टोचल्या तरी चालते असं माझं मत झालं आहे. माझ्या या मतास दुजोरा देणारे व एवढ्याच लसी टोचणारे काही शेळी पालक आहेत.
2) लस म्हणजे काय? हा प्रश्न आता सर्वसाधारण झाला आहे. एक तर रोग निर्माण करणारया सूक्ष्म जीवाचे अकार्यक्षम रूप किंवा त्याच्या मृत पेशी त्या लसीमध्ये असतात दुसर म्हणजे रोग निर्माण करणारा सूक्ष्मजीव प्राण्याच्या शरीरात काही विकर किंवा ऍन्टीबॉडीझ सोडत असतात; लसीमध्ये असे कृत्रिम विकर किंवा ऍन्टीबॉडीझ असतात.
3) जेंव्हा आपण लसी टोचतो तेंव्हा शेळीच्या शरीरातील पांढऱ्या पेशींना रोग निर्माण करणाऱ्या सुक्षमजीवांची किंवा त्यांच्या द्वारे सोडल्या जाणाऱ्या विकारांची कल्पना येत असते,; जेंव्हा केंव्हा प्रत्यक्षात त्या रोगाचे सूक्ष्मजीव शेळीच्या शरीरात प्रवेश करतात तेंव्हा तिच्या शरीरातील पांढऱ्या पेशींकडे त्या सुक्षमजीवविरुद्ध लढण्याची रणनीती व आयुधे तयार असतात. या पूर्वसज्जतेलाच आपण रोगप्रतिकार शक्ती असे आपण म्हणतो.
4) fmd हि लस ऑइल इमर्सड स्वरूपात येते त्यामुळे ती मांसात टोचावी लागते. कातडी खाली टोचल्यास त्या जागी गाठ निर्माण होते. हि लस घट्ट असते त्यामुळे लसीकरण करताना जनावरास त्रास होत असतो. बाकी सर्व लसी वेगवेगळ्या पातळ मीडिया मध्ये येत असतात आणि त्या कातडी खाली टोचाव्या लागतात. त्यांनी काही त्रास होत नाही.
5) माझ्या माहिती प्रमाणे सर्वच लसी गाभण, विलेल्या तसेच 2 महिण्यापुढील शेळ्यांना आपण टोचू शकतो. काही अडचण येत नाही 6) आतापर्यंत मी  सरकारी व खाजगी दवाखान्यातू विकत घेऊन किंवा मोफत वेगवेगळ्या कंपनीच्या वेगवेगळ्या रोगांसाठीच्या लसी गेली किमान 10 -15 वर्ष आमच्या मेंढरास टोचत आहे. मला आत्तापर्यंत कोणत्याही लसीचा बाटलीवर (व्हायल) 'गाभण जनावरास हि लस टोचू नये' असे निर्देश आढळले नाहीत.
7) शेळ्यांना लस टोचली म्हणजे आपण निश्चिन्त होऊ शकत नाही. त्याचे कारण असे कि लस टोचल्याने रोग येण्यास प्रतिबंध होत नाही तर त्या रोगविरुद्ध लढण्याची रोग प्रतिकारक्षकती तयार होते. आता रोग प्रतिकार शक्ती तयार झाली म्हणजे रोग येणार नाही असे होत नाही. माझ्या मेंढरांचे उदाहरण मी येथे देईन. सन 2000 सालच्या आसपास आमच्या मेंढरात लाळ्या खरकुत म्हणजे fmd हा विषाणू जन्य रोग आला होता. तेंव्हा या रोगविषयी आम्हाला अजिबात माहिती नव्हती, साहजिक लसीकरण हि केले नव्हते. त्या एका वर्षात म्हणण्यापेक्षा एक दोन महिन्यात आमचे खूप मोठे नुकसान fmd ने केले. हा रोग चांगल्या तंदुरुस्त धडधाकट मेंढ्याना येतो. मेंढी लवकर मरत नाही, किमान या 8-10 दिवस ती जगते, पण या दिवसात सुरवातीला तिला खाता पिता येत नाही व नंतर चालताही येत नाही. तेंव्हा मेंढ्या फिरस्तीवर असतात, रोज दुसऱ्या गावाला जावं लागत, अश्या वेळेला या न चालनार्या व न खाणाऱ्या मेंढ्यांच्या मोठाच उपद्व्याप असायचा. कितीक किलोमीटर अंतर अश्या आजारी मेंढ्या खांद्यावर उचलून मेंढ्यांबरोबर वागवाव्या लागायच्या. संध्याकाळी पुन्हा त्यांना लुसलुशीत चारा आणून स्वतःच्या हाताने एक एक घास भरवून चारावं लगे.  जीव नकोसा व्हायचा. शेवटी अशक्त पणाने मेंढ्या मरायच्या, काहींना जागेवरच सोडून पुढच्या गावाला निघून जावं लागे. नुकसान तर व्हायचंच पण अतोनात कष्ट उपसावे लागे.
त्यानंतर च्या वर्षी आम्ही इंटेरवेट
कंपनीची लस आणून टोचली. .  मग साधारण त्यावेळेला आमच्याकडे 250 पेक्षा जास्त मेंढ्या होत्या. लस तोचल्यानन्तर साधारण 20 एक मेंढ्याना महिन्या दीड महिन्याच्या कालावधीनंतर लाळ्या खरकुत ची लागण झाली. पण या वेळेला मेंढ्या त्या मनाने लवकर बऱ्या व्हायच्या. तोंडाला लाळ यायची पण पायात रोग उतरत नसायचा. पुढच्या वर्षी लस तोचल्यानन्तर रोग येण्याचं प्रमाण अगदीच कमी झाले. आणि fmd ची भीती कमी झाली. त्यांनतर आम्ही बरीच वर्ष fmd ची लस न चुकता देत असू, त्या रोगाचे प्रमाण व नुकसान करण्याची क्षमता कमी झाली. हे लक्षात अल्यांनंतर आम्ही जेंव्हा मेंढ्याना प्रत्यक्ष fmd ची लागण होते तेंव्हाच fmd ची लस टोचू लागलो. गेली 2-3 वर्ष आम्ही fmd ची लस मेंढ्याना दिली नाही.
8) लस टोचल्याने त्या रोगविरुद्ध लढण्याची त्या शेळीची क्षमता वाढते, परंतु रोग त्या शेळीला होणार कि नाही हे त्या रोगाचा किती प्रादुर्भाव झाला, किती इनाकुलम आहे, वातावरण कसे आहे, शेळीची तब्यत कशी आहे या सर्व बाबींवर अवलंबून आहे. ती लस टोचून किती दिवस झाले हे देखील महत्वाचे आहे.
9) कळपातील सर्व शेळ्यांना एकाच वेळी लसीकरण करणे हिताचे आहे. समजा गाभण शेळ्या वगळून लसीकरण केले व त्यातील एखाद्या शेळीला तो रोग झाला तर तुमच्या कळपत त्या रोगाचा इनकुलम वाढलाच म्हणून समजा. म्हणजेच इतर लसीकरण केलेल्या शेळ्यांना देखील रोग होण्याची शक्यता वाढते.
10) जसे एखाद्या औषधाला वेगवेगळा शेळ्या वेगवेगळा रिस्पॉन्स देतील तसेच लसीकरणाची परिणामकारकता वेगवेगळ्या शेळ्यांसाठी वेगवेगळी असेल.
11) माणसांचा गोवर व शेळ्यांचा मावा हे रोग म्हणजे लसीकरणाची नैसर्गिक उत्तम उदाहरण आहे. परंतु या रोगांची एकदा लागण झाली व त्यातून माणूस व शेळी बरी झाली कि पुन्हा त्यांना जीवनभर हे रोग होत नाहीत अस
आपण ऐकतो.  शेळ्यांच्या बाबतीत बाकीच्या रोगांसाठी आपल्याला साधारण दर सहा महिन्याला लसीकरण करण्याची शिफारस केली जाते. बहुदा या रोगांविषयी जी माहिती शेळीच्या शरीराने साठवून ठेवायला हवी ती राहत नसावी.
बाळू मोटे बारामती
27

1) औषधे जवळ असणे व त्यांच्या उपयोगाची माहिती असणे शेळी पालन व्यवसायात कळीचा मुद्दा आहे. सध्या जे जनावरांचे डॉक्टर आहेत ते बहुतेक करून संकरित गाईंचे तञ् आहेत. या व्यवसायातील शेळ्या मेंढ्यांचे तञ् डॉक्टर फार कमी आहेत अस माझं निरीक्षण आहे. त्यामुळे शेळ्यांना येणारे रोग ओळखता येणे, त्यांच्यावर योग्य त्या औषधांचे उपचार करणे या बाबी शेळी पालकाने पहिल्या तीन वर्षात शिकून घेणे अपेक्षित आहे.
2) खाली औषधांची यादी देत आहे, किमान एवढी तरी औषधे आपणाकडे असायलाच हवीत. औषधे पाजता यावीत, इंजेक्शने टोचता यावीत, हे जमत असेल तरच शेळीला आपण किमान डॉक्टर येईपर्यंत वाचवू शकतो.
3) अँटिबायोटिक
एन्रोफ्लोक्सासिन-फ्लोबॅक एस ए, मेरिक्विन, क्युरेक्स इ.
जेंटमायसिंन इंजेकशन
टायलॉसिन- टायलोवेट इंजेकशन
ऑक्सी टेट्रासायक्लीन
सट्रेप्टो पेनिसिलिन इंजेकशन
सेफाल्याक्झीन- पावडर, गोळी
ट्रायमिथोप्रिंम- ओरिप्रिम इंजेकशन, सेपमाक्स गोळी
नोरफ्लोक्सासीन व टिनिडझोल गोळी
ऑफलोकझासीन व ओरिनिड्याझोल- पॉवर जिल सिरप

वेदनाशामक व तापनिवरक

निमुसुलाईड इंजेकशन
निमुसुलाईड व पॅरासीतेमोल गोळी
प्रेडणीसोलोन इंजेकशन

रेचक

खाण्याचा सोडा
सायट्रिक ऍसिड,
असेटिक ऍसिड (शक्य असल्यास)
प्रोबायोटिक गोळी
पाचक टॉनिक
अस्परजिलस ओरायझी वर आधारित पाचक टॉनिक
रुमेन ऍसिड नूट्रालायझेर

टॉनिक

कॅलसियम फॉस्फोरस टॉनिक- ऑस्टोवॅट
व्हिटॅमिन - अ ड इ के इ आणि बी कॉम्प्लेक्स
सेलेनियम व व्हिटॅमिन इ इणजेक्शन
मिनरल मिकश्चर पावडर- रोज वापरासाठी ऍग्रिमीन फोर्ट

जखमेसाठी/अँटीसेप्टिक

टोपीक्युअर प्लस स्प्रे
हिमॅक्स मलम
झिंक ऑक्सईड
सट्रेप्टो पेनिसिलिन पावडर
टिंक्चर आयोडीन
हायड्रोजन पेरॉक्साईड
डेल्टामेथ्रीन-किडे मारण्यासाठी

इतर-

एपिडोसिन इंजेकशन-
विताना वेना देण्यासाठी
ऍट्रोपीन सल्फेट इंजेकशन- विष उतरवण्यासाठी
क्लोरोफिनारामाईन म्यॅलेट इंजेकशन- विष निवारक
Ors पावडर- रिहायड्रेशन साठी
डिस्टील वॉटर- इंजेकशन बनवण्यासाठी
Dns सलाईन (शक्य असल्यास)
गोचीड पिसवा नाशक औषधे- डेल्टामेथ्रीन, सायपरमेथ्रीन, अमीट्राझ, bhc पावडर इ

जंत नाशक

आयव्हरमेकटीन, क्लाझंटेल, अलबंड्याझॉल, फेनबंड्याझोल, ट्रायक्लोबंड्याझोल (तिन्ही पैकी एक), निल्कोझामाईड व अलबंड्याझॉल, ओक्सिक्लोझनीड व लिव्यामिसोल.

4) वरील औषधे खरेदी करून सुरक्षित ठेवावीत. गरजेनुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरावीत.(बहुदा घरची औषधे वापरण्यासाठी डॉक्टर सल्ला देत नाहीत) कोणती औषधे कशासाठी वापरायची ते मोबाईल मधील नोट पॅड किंवा मेमो नावाच्या अप्लिकेशन मध्ये नोंद करून ठेवावे, त्याचा वर्षातून किमान एकदा बॅकअप घ्यावा. औषधांचे परिणाम व दुष्परिणाम माहिती करून घेऊन मगच औषधे वापरावीत. या माहितीच्या उपयोगाने आपले काही नुकसान झाल्यास लेखक या अर्थाने मी (बाळू मोटे) त्यास कोणत्याही परिस्थितीत जबाबदार राहणार नाही याची कृपया जाणीवपूर्वक नोंद घ्यावी.


26

1) अनुवंशिकता अभ्यासणे खूपच रोचक आहे. सर्व प्राणी वनस्पती मात्रांचा हा न दिसणारा काहीसा गुंतागुंतीचा, किचकट व थोडासा अनप्रेडिक्टेबल विषय आहे.
2) निरंतर अभ्यास आणि तसे नियोजन या मुळे आपण नक्कीच शेळ्यांच्या  वांच्छित वंशवृद्धीसाठी प्रयत्न करू शकतो.
3) अडगुलं मडगुलं नावाचा एक चित्रपट नुकताच पहिला, त्यात नवरा बायकोच्या दोनीही घरात कोणीच काळ रंगाचं नसतं पण त्यांना मूल मात्र काळ्या रंगाचं होतं. चित्रपटातील कथा काही शास्त्रीय पुरावा म्हणून कोठे मांडता येत नाही.
4) माध्यमिक शालांत अभ्यासक्रमात मराठी भाषेत 'कलिंगड' नावाचा एक धडा होता. त्यात नायिका एक मुलगी दत्तक घेते, नायिकेच्या लहानपणी कलिंगड खरेदी करतानाच एक वाक्य असत ते अस- 'कलिंगडाच्या आत घर करून राहायचं, आणि आतील गर खायचा, किती माजा'. जेंव्हा नायिका व तिची दत्तक मुलगी कलिंगड घ्यायला जातात तेंव्हा हेच वाक्य ती दत्तक मुलगी नायिकेला सांगते. आणि आई मुलीचं नातं घट्ट होतं.
5) आमच्या गावात एक वायरमन आहेत. ते बोलताना नेहमी शिव्या देतात, अर्थात त्या सर्व शिव्या प्रेमाच्या असतात. आम्ही मोठे झालो आणि त्यांचा मुलगा देखील मोठा झाला. बापाचा तो शिव्या देण्याचा गुणधर्म मुलांमध्ये जसाच्या तसा उतरलेला दिसत आहे.
6) 'आई तशी लेक आणि बाप तसा बेटा' अशी एक म्हण आपल्याकडे आहे, त्यातून हेच विदित होते कि आईचा स्वभाव मुलींमध्ये व बापाचा स्वभाव मुलांमध्ये उतरतो.
7) माझ्या शेळ्यांमध्ये दोन संख्या बहिणी होत्या, त्या दोघीना गेल्या वर्षी एकाच बोकडाने भरविले, त्या दोघीना सारखीच करडे झाली, एकाच रंगाची, दिसायला एक सारखी. ती दोघे एकमेकांचे सखे मावस भाऊ व सावत्र भाऊ होत.
8) एका शेळीला सुरवातीला एक बोकड झाला, तो तीन महिन्यानंतर त्याला काहीसा गुडघ्याच्या आजार झाला तो अशक्त होऊन मेला. दुसऱ्या वर्षी त्याच शेळीला एक पाठ झाली दोनीही करडांचे आई बाप तेच होते, आणि पाठीला देखील तोच प्रॉब्लेम आला होता. औषध उपाय करून त्या पाठीला त्यातून वाचवली.
9) एक शेळी खूपच वढाळ होती, तिची पाठ देखील तिच्यासारखीच वढाळ निघाली, तिला त्यामुळे विकून टाकली.
10) सध्या एक शेळी आहे, ती खाण्या पिण्याच्या बाबतीत फारच चोखंदळ आहे. तिला आत्तापर्यंत सहा करडे झाली, सगळी स्वभावाने तिच्यासारखीच चोखंदळ होती. कोणाचा उष्ठा खुराक अजिबात खात नाहीत.
11) पिल्लं टाकून देण्याचा गुणधर्म सुद्धा असाच काही प्रमाणात अनुवांशिक आहे असं माझं ठाम मत झालं आहे.
12) शेळी गाभडण्याची वेगवेगळी करणे असतात. काही शेळ्या प्रजनन प्रक्रियेत कमजोर असू शकतात आणि त्या वारंवार गाभडू शकतात. त्यांच्या पुढच्या पिढीत देखील हा गुणधर्म येउ शकतो. माझ्याकडे अजून या विषयी पुरेसा डेटा उपलब्ध नाही.
13) गोचीड निर्मूलन केल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा गोचीड होणार, होत असतात. माझ्याकडे एक शेळी आहे, तिला सर्वात प्रथम कानाला गोचीड दिसतात. तिला गोचीड आढळला कि मी समजतो पुढील 15 दिवसात आपणास गोचीड निर्मूलन करावं लागेल. तिचा हा गुणधर्म मला सध्याच्या तिच्या 4 महिने वयाच्या पाठिमध्ये दिसून आला.
14) एक बुटकी शेळी होती, खूप मारकुटी होती, पहिल्या वर्षी झालेली तिची पाठ ठेवली होती, ती देखील खूप मारकुटी आहे.
15) मला वाटतं नुसतं वजन, रंग, उंची इ गुणधर्माबाबत फक्त अनुवंशिकता मर्यादित नसून, स्वभाव, चोखंदळ पणा, करडांप्रति मायाभाव, रोगांविरुद्ध लढण्याची क्षमता, प्रजनन क्षमता इ गुणधर्म देखील अनुवंशिकतेने पुढे येत असतात.
16) वरील सर्व विवेचन कोणत्याही शास्त्रीय पुराव्यावर आधारित नक्कीच नाही, त्या अनुषंगाने आपण सर्वांनी जरूर विचार करायला हवा...
शेवटी पु लं देशपांडे यांनि अनुवंशिकते संबंधी सांगितलं आहेच, ' वजन कमी करण्याचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो'....
बाळू मोटे
25

1) सेफाल्याक्झीन (cephalaxin) नावाचे एक अँटिबायोटिक आहे. मी ते शेळ्यांमधील पोट वीकारांसाठी वापरतो. हे औषध वेगवेगळ्या कंपन्या तयार करतात. माणसांसाठी व जनावरांसाठी ते तयार केले जाते.
2) ग्लाक्झोस्मितक्लाईन (gsk) नावाची कंपनी माणसांसाठी एक 250mg ची dispersible tablet बनवते तर विरबॅक नावाची कंपनी जनावरांसाठी लिक्झेंन नावाची पावडर 20ग्राम च्या पुडी (सॅशे) मध्ये बनवते.
3) gsk ची एक 250 mg ची (dt) गोळी 12 रु ला मिळते. म्हणजे 12 रु भागिले 250 बरोबर 0.048 रु प्रति mg होय.
4) विरबॅक च्या एक ग्राम पॉवडर मध्ये 75mg सेफाल्याक्झीन असते म्हणजे 20ग्राम गुणिले 75mg बरोबर 1500 mg होय. 20 ग्राम ची एक पुडी 72 रु ला मिळते म्हणजे 72 भागिले 1500 mg बरोबर 0.048 रु प्रति mg होय.
5) या सर्व कंपन्या किती पुढचा विचार करतात हे यावरून स्पष्ट व्हावे...!
6) दुसऱ्या एक कंपनीची 250 mg ची dt गोळी 8 रु ला मिळते. रिझल्ट वरील दोहा सारखेच मिळतात.
7) यात कॅप्सूल स्वरूपात 500 mg ची गोळी मिळते ती dt म्हणजे dispersible नसते ती जवळ पास निम्याने स्वस्त मिळते. रिझल्ट देखील तेवढेच चांगले मिळतात
24

1) मुरघास करण्यासाठी मकेची कुट्टी करणे व ती टाकीत भरणे हे काम सोपे नाही. त्यात सोपे पणा अनानेसाठी गेल्यावर्षी थोडं डोकं चालवलं होतं.
2) खरं तर मुरघासाचा टाकीजवळ मका आणून ट्रॅक्टर माउंटेड चाफ कटर च्या साह्याने मका कुट्टी करून टाकीत सहज भरता येते. हा चाफ कटर मका कुट्टी पण करतो आणि टाकीत पण भरतो. पण याची किंमत जास्त असून सर्व सामान्यांच्या आवाक्यात नाही.
3) माझे एक गुरुजन जे शेतकरी आहेत ते हा चाफ कटर भाडोत्री देतात. शेतात चाफ कटर नेऊन मकेची कुटी करून ट्रॉलीत भरायची आणि पुन्हा ट्रॉली मुरघासाचा खड्यात किंवा टाकीत ओतायची.
4) मी गेल्या वर्षी छोटी कुट्टी मशीन ट्रॉलीत ठेवली, ट्रॉली सह कुटी यंत्र शेतात नेऊन विजेच्या खांबावरून वीज घेऊन ट्रॉलीत कुट्टी केली. पुन्हा हे सगळं साडगं मकेच्या कुट्टी सहित मुरघासाचा टाकीजवळ आणायचं; त्यातली कुटी टाकीत भरायची व पुन्हा कुट्टी यंत्रासह ट्रॉली शेतात न्यायाची.
5) या पद्धतीत वेळ, श्रम वाचले, मुरघास करायला सोपं गेलं.
खालील चित्र पहावे.

बाळू मोटे


23

1) चारा साठवणूक करणे हि बंदिस्त शेळी पालनाची विशेषतः कोरडवाहू भागातील महत्वाची गरज आहे. चाऱ्याचा पुरेसा स्टोक असणे व तो पाऊस, ओलसरपणा, वारा, ऊन इ पासून उच्च प्रतीचे संरक्षण करणे अति आवश्यक ठरते.
2) खरे तर साठवलेला चारा शेळ्यांना खाऊ घालू नये असं माझं मत आहे; त्याच कारण म्हणजे एक तर त्याची किंमत वाढते व दुसरे म्हणजे त्याच्यातले अन्नघटक काही प्रमाणात कमी होतात उदा प्रोटीन 2 %नि कमी होते आणि तिसरं म्हणजे त्याची palatability/ स्वादिष्टता कमी होते.
3) परंतु कोरडवाहू भागात किंवा केवळ ज्या ठिकाणी वर्षभर हिरव्या चाऱ्याची उपलब्धता होईल याची हमी देता येत नाही अश्या ठिकाणी चारा साठवणूक करावा लागतो तरच बंदिस्त शेळी पालनास अर्थ आहे नाहीतर सर्व व्यर्थ आहे. अश्या ठिकाणी चाऱ्याची सकस्ता हा दोन नंबर चा मुद्दा होतो आणि चाऱ्याची उपलब्धता हा एक नंबर चा मुद्दा होतो.
4) चारा साठवण्याचा दोनच पद्धती चांगल्या आणि व्यवहार्य आहेत, असे मी माझ्या अभ्यासावरून व अनुभवावरून सांगू इच्छितो. एक म्हणजे सुकी पद्धत त्याला वैरण वगैरे तर दुसरी म्हणजे ओली पद्धत त्याला मुरघास वगैरे आपण म्हणतो. सुक्या पद्धतीत चारा उन्हात वळवून त्यातील ओलावा 10-8टक्के पेक्षा कमी करून अखंड किंवा कुट्टी करून साठवतात. ओल्या पद्धतीत चारा 60-65 टक्के ओलावा असताना व कुट्टी करून आंबवून किंवा काही रसायनांचा उदा युरिया वैगरे चा उपयोग करून हवाबंद पद्धतीने साठवतात.
5) पारंपरिक वैरण साठवण्याची पद्धत सर्वांच्या परिचयाची असते.तीस पाऊस, ओलावा,वारा, उंदीर, आग इ पासून जपावे लागते.
6) मुरघास बनवण्याचे व ओला चारा साठवण्याचे तंत्र आता बहुअंशी अभ्यासाचे, परिचयाचे व अनुभवाचे झाले आहे. मुरघास कसा बनवावा, साठवावा व वापरावा याविषयी यथे उहापोह करावयाचा नाही मुरघसच्या अथ पासून इथपर्यंतच्या  प्रक्रियेत ज्या काही नकारात्मक बाजू पहिलारू शेतकऱ्याला भेडसावतात त्या बद्दल फारसं कोणी बोलत नाही. कानाला चिमटा...! बऱ्याचदा या चिमट्यातली वेदना समजून घेण्याइतपत आपले विचारचक्षु तीक्ष्ण नसतात! मी या चॅनेल वर लिहितो, हे अनुभवांचे/आत्मक्लेशाचे फुगे आहेत, हे किती फुगवायचे आणि कोणाला वाटायचे, विकत कि फुकट!
हे असं केलं नसतं तर बरं झालं असत, अस वाटतं ते केल्यावरच! एका विकसनशील देशातल्या नागरिकांकडून आपण आणखी काय अपेक्षा ठेवणार! यशाची गुरुकिल्ली सांगणारे बरेच भेटले, अपयशाचा मास्टर पीस उलगडून दाखवणारा वाटाड्या सहसा नाही भेटला.
पहिल्या प्रयत्नात जे नुकसान होतं ते पाहून पहिल्या प्रयत्नांत जो उत्साह असतो त्याचे रूपांतर failurnes मध्ये किंवा प्रयत्नांचा पराभव होतो. दुरितांचे तिमिर जाण्यासाठी मुरघसच्या या पहिल्या प्रत्नाचा अयशस्वी पराभव स्वीकारण्याची तयारी देखील सुरवातीलाच करून ठेवायला हवी.
7) एकदम मोठी 60 टन,80,200 टन टाकी बांधण्यापेक्षा छोट्या शेळी पालकाने प्रत्येकी 10 टनांच्या पाहिजे तितक्या टाक्या बांधाव्यात.
8) मुरघास उघडताना टाकीच्या 7 बाजूंपैकी कोणत्याही सोईस्कर एका बाजूकडून ती बाजू संपूर्ण उघडेल या पद्धतीने उघडावा व पूर्ण बाजूचा थोडा भाग खरवडून मुरघास काढावा. समजा आपण वरच्या बाजूने मुरघास उघडणार असू तर वरती घातलेला कागद पूर्ण काढावा व पूर्ण बाजू खरवडून मुरघास काढावा. मोठ्या टाकीत असं शक्य होत नाही.
9) मुरघास शक्यतो वरून उघडावा व वरून खाली काढावा.
10) मुरघासाचा माझा पहिला प्रयोग हा वेंधळ वेडा होता. Kvk त असताना बरेचदा मुरघास बनवताना पाहिला, शेतकऱ्यांना सांगितलं, अभ्यास वैगरे केला, डेमो वैगरे दिले. तरीही माझ्या पहिल्या छोट्या प्रयोगात अर्धा मुरघास कुजका निघाला. मी पक्व मका वापरली, चुकीच्या पद्धतीने उघडला, जेवढा रोजचा उपसा असायला हवा तेवढा केला नाही, भिंतींना चांगलं प्लास्टर नव्हतं आणि पावसापासून पुरेसं संरक्षण नव्हतं.
11) मूरघासात मीठ, गुळ, मिनरल मिकश्चर आदी तस्तम पदार्थ वापरण्याचा सल्ला दिला जातो. माझ्या मते ते काहीही वापरू नये. मूरघासात सायलेज कल्चर किंवा ते नसेल तर दही किंवा ताक वापरावे. येन केन प्रकारे त्यात लेक्टॉ बॅसिलस नावाचे जिवाणू जाणे आवश्यक असते.
12) मुरघास शेणा मातीने बंद करण्याचा सल्ला दिला जातो. खरोखरीच तसं शक्य होतं काय? हवा बंद करण्याची दुसरी कोणती सोपी पद्धत आहे?
13) मुरघास शक्यतो मका पिकाचाच करावा, इतर अनेक पिकांचा करता येतो पण करू नये असं मला वाटतं.
14) मुरघासाची टाकी अभ्यास करून बांधावी. टाकी बंधातानाच चुका होतात आणि मग ते कायमचं निस्तराव लागतं. या साठी प्रथम छोट्या प्रमाणात डेमो करून पहावा.
15) नकारात्मक अनुभवांचे किंमत नकारात्मक असते कि काय? ह्यांची देवाण घेवाण केली नाही तर आपण कसले मैत्र जीवांचे परस्परे पडो.
22

1) जून महिन्यात दोन शेळ्यांना 2-2 करडे झाली व दुसऱ्या दोन शेळ्यांना 1-1 करडू झाले. त्यांच्यापासून आपणास मिळणारे उत्पन्न कसे आहे व ते आपणास परवडते का त्याचा विचार या पोस्ट मध्ये करायचा आहे.
2) एका शेळीचा तिच्या गाभण काळातला व तिच्या वेतातील पहिल्या तीन महिन्याचा तसेच तिच्या करडांचा पहिल्या तीन महिन्याचा संगोपनाचा खर्च असं सर्व गृहीत धरून 375 रु प्रति महिना मनाला आहे. म्हणजे 8 महिन्याचा एकूण खर्च (फक्त चारा व खुराक) हा 3000 रु होतो.
3) सोबतच्या चित्रात करडांचे 90 दिवसांची वजने काढली आहेत. 90 दिवसाचं वजन अधिक जन्मतः वजन गुणिले 200 रु असं गणित करून त्यांची विक्री किंमत काढली आहे.
4) पहिल्या शेळी पासून मिळणारा निवळ नफा :-3950-3000=950 रु
दुसरया शेळी पासून:-3340- 3000=340 रु
तिसऱ्या शेळीपासुन :-4445- 3000=1445रु
4थ्या शेळीपासुन:- 4354-3000=1354रु.
5) आपल्याला एका शेळी पासून 8 महिन्यात किमान रु 3000/- निवळ नफा मिळायला हवा.
6) एका शेळीला जेंव्हा एकच करडू होते तेंव्हा तिच्याकडून त्या वेतात जास्त निवळ नफा मिळण्याची काही अश्या राहत नाही.
7) 2 करडे चांगल्या वजनाची मिळण्याकरिता शेळीची अनुवंशिकता चांगली असणे आवश्यक ठरते.
8) चारा घरचा असल्यास चार्यापासून जे उत्पन्न मिळेल ते नफ्यात धरले नाही; ते धरल्यास नफा आणखी वाढेल.
9) खुराक घरचा असल्यास वरील प्रमाणे नफा आणखी वाढेल.
10) मार्केटिंग कौशल्य नुसार नफा आणखी वाढेल.


बाळू मोटे बारामती


21

1) या पोस्ट मध्ये मी माझ्याबद्दल थोडक्यात लिहिणार आहे, या लिखाणाचा उद्देश केवळ एवढंच आहे; या चॅनेल चा लेखक नेमका कोण आहे, त्याचा अनुभव काय आहे, हे आपणास समजावं.
2) पोस्ट क्रं 1 मध्ये मी आत्मप्रौढी बाबत लिहिलं होतं, इथं कदाचित ते होईल असं वाटत; काही अंशी ते अपरिहार्य आहे असं मला वाटतं. स्वतः बद्दल सांगणं, स्वतःची ओळख करून देणं यात काही गैर आहे, असही काही नाही, बहुतेक जणं हे विधान मान्य करतील.
3) आपण नेहमी तञ् किंवा अनुभवी लोकांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करतो, नव्हे तसा तो आवर्जून करणे हे आपल्याच हिताचे असते.
4) मी कृषी शाखेचा पदवीधर आहे (BSc. Horticulture). 2008 ते 2014 पर्यंत मी कृषी विज्ञान केंद्र बारामती या संस्थेत कृषी विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत होतो. kvkbaramati. com नावाच्या वेबसाइटवर आपण या कृषी विज्ञान केंद्राची माहिती पाहू शकता. हे पद सर्वात कनिष्ठ तांत्रिक पद होते. माझ्याकडे 2008 ते 2012 पर्यंत टोमॅटो उत्पादन वाढी संबंधी एक केंद्र शासनाचा प्रकल्प होता, त्यानंतर पुन्हा 2011 ते 2014 पर्यंत आणखी एक दुष्काळ निवरणासंबंधी करावयाच्या उपाय योजनांचा प्रकल्प होता. हि माझी तिथली प्रमुख कामे. या व्यतिरिक्त मी तेथे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे, kvk च्या उत्पादनांचे प्रदर्शन लावणे, संस्थेच्या अंतर्गत रिपोर्टींग व डॉक्युमेंटेशन करणे, स्वयंचलित खते व सिंचन देणारी यंत्रणा चालवणे इ कामे करत असे. यशवंत राव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक यांचे मार्फत तेथे कृषी पदवीचा कोर्स चालवला जातो, यात मला मुलांना भाजीपाला हा विषय शिकवावा लागे. दर शनिवारी व रविवारी याच्या तासिका असायच्या. आम्ही एक इटली या देशातून टोमॅटो रोपे लागवड यंत्र आणले होते, त्याचा काही उपगो होत नव्हता. मी त्यात थोडीशी अड्जस्टमेंट करून ते यंत्र ऊस रोपे लावण्याकरिता तयार केले व त्याची यशस्वी चाचणी देखील घेतली. या संबंधीचा व्हिडिओ आपणास kvk च्या वेबसाइटवर किंवा यु ट्युब वर पाहायला मिळेल. Kvk च्या नवीन इमारतीचे उदघाटन करण्याकरिता महामहिम राष्ट्रपती श्री प्रणव मुखर्जी kvk त आले होते, या कार्यक्रमात kvk च्या वीस वर्षाच्या कामाचा आढावा घेणारे एक पुस्तक प्रकाशित झाले होते, त्या पुस्तकाचा कच्चा मसुदा मी व माझ्या सहकार्यांनी तयार केला होता. हा मसुदा तयार करण्यासाठी आम्हाला साधारण वीस दिवस लागले. या कमी आम्ही kvk चे सर्व जुने दप्तर चाळून काढले, एक प्रकारचे ते संशोधन होते.  दुष्काळ निवारण संदर्भातल्या उपाय योजना बाबत मी एक पुस्तक तयार केले होते, ते संपादनाची अंतिम टप्प्यात आले होते परंतु नोकरी सोडल्यामुळे ते काम पूर्ण झालं नाही. माझे ऍग्रोवोंन मधून बरेच लेख प्रकाशित झाले आहेत.Kvk मध्ये एक किऑस्क किंवा टच स्क्रीन संगणक आहे, त्यावर एक ppt बेस प्रोग्रॅम मी बनविला होता, अर्थात मी नोकरी सोडल्यामुळे तो अपुर्ण राहिला आहे. तसेच एक LED टीव्ही आहे त्यावर kvk च्या उत्पादनांची माहिती दाखवली जाते. ती माहिती मी बनविली होती. शेतकरीयांच्या ऑनलाइन विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्याचं काम मी एक वर्ष केलं होतं, आता ती वेबसाईट कधी बंद असते तर कधी चालू. (Aaqua.org). मी काम करत असलेल्या दुसऱ्या प्रोजेक्ट ची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात अली, kvk च्या वतीने माझा व गावाच्या वतीने एक शेतकरी श्री पांडुरंग वाबळे यांचा सत्कार आयसीआर चे त्यावेळी चे उपमहासंचालक श्री एस अय्यपन यांचे हस्ते झाला. त्यावेळला आम्हाला विमान प्रवासाचा योग्य व दिल्ली फिरून पाहण्याचा योग्य देखील kvk मुळे मिळाला.
Kvk ला अनेक पुरस्कार मिळालेत, त्यापैकी दोन पुरस्कारांसाठी मी प्रपोझल्स बनविली होती. Fao यांचे एक पिकांना पाणी देण्यासंबंधीचे CROPWAT नावाचे सॉफ्टवेअर ऑनलाइन मोफत मिळते, याचा मी अभ्यास करून स्वयंचलीत प्रणालीवर पाणी मोजून देण्याचे प्रयोग केले होते. Kvk तील कामाबाबत आणखी बरेच लिहिता येईल. तेथील माझ्या गुरू व kvk च्या प्रमुख डॉ कादरभाई या होत्या. खरं तर मी जे काही तेथे काम केलं ते केवळ त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मला करता आलं. त्या नसत्या तर कदाचित मी तेथे एक वर्ष देखील नोकरी करू शकलो नसतो. एखाद्या संस्थेचा प्रमुख कसा असावा, मॅनेजमेंट कसं असावं, नियोजन आणि ध्येय धोरण कशी आखावी आणि राबवावेत, प्रेझेन्टेशन कशी करावीत हे सर्व आणि आणखी कितीतरी बाबींचे आदर्शवत उदाहरण म्हणजे डॉ कादरभाई या होत. या कार्यकाळात अनेक राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षणे घेण झालं. बराच भारताचा बराच भाग फिरायला मिळाला. मी kvk चा व डॉ कादरभाई यांचा सतत ऋणी आहे.
5) शेळ्या व मेंढ्या सांभाळणे हा आमच्या फॅमिलीचा पारंपरिक व पूर्वापार व्यवसाय आहे. माझ्याकडे सध्या 200 मेंढरं आहेत आणि ती सतत फिरतीवर असतात. पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील बराचसा भाग मी मेंढरमागे सुट्टीच्या (दिवाळी, उन्हाळा इ) फिरून काढला आहे. अनेक जणांच्या शिव्या खाल्या, काही ठिकाणी मार देखील खाल्ला आहे

. सध्या मेंढरमागे माझी आई, मावशी मावसभाव असतात. मी इकडे  शेळी पालन व शेती सांभाळून त्यांना मदत करत असतो. आर्थिक स्थिती बेताची असल्याने माझं शेळी पालन मंद गतीने पुढे जात आहे.
6) 2014 मध्ये नोकरी सोडल्यावर काही ठिकाणावरून नोकरी साठी बोलावणे आले होते, पण शेळी पालन करायचं हा निश्चय करून मी आमच्या कोरडवाहू शेतीत आलो. अजूनही येथेच शेळी पालनात करियर करायचं या निर्णयावर मी ठाम आहे. (उद्या कदाचित हा निश्चय बदलू शकतो.).

धन्यवाद.
20

1) अती तेथे माती अशी आपल्याकडे एक म्हण सर्वमुखी आहे.
2) सुवर्णमध्य साधने म्हणजे एखाद्या बाबीचा समतोल साधने होय.
3) सॅच्युरेशन म्हणजे संपृक्त स्थिती होय. पाणी धरून ठेवणे हा मातीचा एक भौतिक गुणधर्म आहे. मातीमध्ये सतत पाणी ओतत राहिलो तर माती स्वतःमध्ये पाणी धरून ठेवते पण तिच्या एक विशिष्ट पातळी पर्यंत धरून ठेवते, जेंव्हा हि विशिष्ठ पातळी गाठली जाते आणि अश्या वेळेला जेंव्हा पाण्याचा एक थेंब जरी टाकला तरी तो वाहायला लागतो. या स्थितीला ती माती पाण्याने संपृक्त झाली किंवा सॅच्युरेट झाली अस आम्ही (agricos) म्हणतो.
4) शेळ्यांना व करडांना जो चारा, खुराक किंवा टॉनिक वैगरे आपण देतो त्याबाबतीत आपण या सॅच्युरेशन च्या पॉईंट चा विचार करायला हवा.
5) जसा जसा सॅच्युरेशन चा पॉईंट जवळ येत जाईल तसे चारा खुराक इ वाया जाण्याच प्रमाण वाढत असणार.
6) प्रमाणबद्ध व स्टॅण्डर्ड वजन वाढीकरिता जातीपरत्वे किती चारा खुराक वैगरे दयावा जेणे करून चारा खुराक जास्त होऊन वाया जाणार नाही याचा काही अभ्यास कोठे झाला आहे काय?
7) माझ्या मते खुरकाच्या बाबतीत करडांना व शेळ्यांना तेवढा खुराक द्यावा, जेवढा त्या एका दमात खाऊन संपवतात. म्हणजेच खाऊन थोडा शिल्लक राहायला हवा.
8) एका दमात खाऊन झाल्यानंतर त्यांचं पाहिलं मानसिक समाधान(जे पचन संस्थेशी अत्यंत निगडित आहे) म्हणजेच पाहिलं सॅच्युरेशन होईल.
9) अशी किमान तीन सॅच्युरेशन होणे कमाल वजन वाढीकरिता आवश्यक आहेत असं माझं सध्याचं मत आहे (उद्या कदाचित बदलू शकेल).
10) पहिल्या सॅच्युरेशन ला जास्त खुराक खातील व विष्ठेतून, मूत्रातून कमी वाया जाईल, दुसरंया सॅच्युरेशन मध्ये खुराक पहिल्या पेक्षा कमी खातील परंतु विष्ठेतून, मूत्रातून पहिल्या पेक्षा जास्त वाया जाईल तर तिसऱ्या सॅच्युरेशन मध्ये खुराक दुसऱ्या पेक्षा कमी खातील परंतु विष्ठेतून, मूत्रातून दुसऱ्या पेक्षा जास्त वाया जाईल.
11) मला वाटत प्रत्येक शेळी पालकाने आपल्याला किती खुराक देणे परवडते याचा बारकाईने अभ्यास करणे व त्याबरोबरच कमाल परतावा देणारी वजन वाढ कशी मिळवता येईल याचा अभ्यास करायला हवा.
12) वरील विवेचन माझे स्वतःचे (बाळू मोटे) असून त्यासंदर्भात मला कोणताही शास्त्रीय माहितीचा स्रोत मिळाला नाही, सबब या माहितीचा थेट वापर करण्यापेक्षा हि माहिती अ ब क ड समजून आपण येथून पुढील माहिती अनुभवण्यास सुरवात कारावज हि विनंती.
19

1) मिनरल मिकश्चर शेळ्यांच्या आहारात दररोज वापरले पाहिजे, असं सगळे सांगतात आणि ते बरोबर देखील आहे. प्रश्न असा आहे कि ते नेमकं शेळ्यांना कसं खाऊ घालायचं आणि नेमकं किती व कोणत्या कंपनीचं खाऊ घालायचं?
2) शेळ्यांना खुराक व चार्यातून त्यांच्या शरीरासाठी आवश्यक सर्व खनिज व जीवनसत्वे कमी अधिक प्रमाणात मिळतात. भौगोलिक परिस्थितीनुसार काही ठिकाणी काही अन्नद्रवांची मतीमध्येच कमतरता असते, त्यामुळे ती पुढे पिकात येते व त्यानंतर त्याच अन्नद्रव्याची कमतरता जनावरांमध्ये देखील येते. हे सर्व सुसंगत आहे.
3) उदा. बारामती परिसरात बहुतांश जमिनीमध्ये Zn झिंक व Mg मॅग्नेशियम या अन्नद्रव्यांची कमतरता आढळून येते. म्हणून मका पिकास एकरी 10 किलो झिंक व मॅग्नेशियम देण्याची हमखास शिफारस केली जाते. जर अशी कमतरता असलेल्या जमिनीत मका चारा पीक घेतलं आणि त्यास हि दोन्ही अन्नद्रव्य वरखातातून दिली नाहीत तर चार्यातून हि अन्नद्रव्य जनावरांना मिळणार नाहीत किंवा कमी प्रमाणात मिळतील. अडातच नाही तर पोहऱ्यात कोठून येणार?
4) अश्या प्रकारची खनिजांचे व क्षारांची कमतरता जनावरास पडू नये म्हणून मिनरल मिकश्चर द्यायलाच हवे. विशेषतः बंदिस्त शेळी पालनात तर गरजेचं आहेच.
5) मेंढ्याना 20 ppm पेक्षा जास्त जर तांबे हा घटक दिला तर त्याची toxicity (विषारी पणा) येते. शेळ्यांमध्ये देखील येते पण मेंढ्या जास्त सेन्सिटिव्ह असतात.
6) ऍग्रिमीन फोर्ट नावाच्या एका उत्पादनात 1 किलो पावडर मध्ये 1200 mg एवढं कॉपर म्हणजे तांबे असते असे दिले आहे. हि पावडर 25 ते 30 ग्रँम दररोज शेळीला देण्ययाची शिफारस आहे.
7) 1 किलोत(1000ग्राम) 1200 mgम्हणजे (1200/1000=1.2mg/gm) म्हणजे 1 ग्राम पॉवडर मध्ये 1.2 मिली ग्राम/mg कॉपर आहे.
8) दररोजचा डोस 25 ग्रॅम म्हणजे(25x1.2) 30 mg तर 30 ग्राम म्हणजे (30x1.2) 36mg कॉपर आपण शेळीला खाऊ घालणार.
9) जर 25 ग्राम पॉवडर 1 लिटर पाण्यात टाकली तर कॉपर चं 30ppm चं द्रावण तयार होईल आणि जर 30 ग्रॅम पॉवडर 1 लिटर पाण्यात टाकली तर 36 ppm चं कॉपर चं द्रावण तयार होईल. याचाच अर्थ असा कि या डोस प्रमाणे आपण शेळ्यांना त्यांच्या दररोजच्या 20 ppm च्या गरजेपेक्षा 10 ते 15 ppm ने कॉपर जास्त होईल.
10) अजून एका बाबीचा आपल्याला येथे विचार करणे आवश्यक आहे. 20 ppm कॉपर हि त्या शेळीची दररोजची गरज आहे. जी नैसर्गिक रित्या चार्यातून व खुरकातून भागवली जाते. म्हणजेच चार्यातून व खुरकातून काही तरी प्रमाणात कॉपर त्या शेळीला मिळणार आहे. समजा चार्यातून व खुरकातून त्या शेळीला 10ppm कॉपर मिळाले तर एकूण कॉपर 40 ते 46 ppm होईल.
11) मिनरल मिकश्चर खाऊ घातल्यानंतर शेळ्या करडे भुळकांडतात असा माझा अनुभव आहे. 40 ते 46 ppm जर कॉपर शेळीच्या शरीरात जाणार असेल तर त्याचे toxisity निर्माण होईल जिचे परिणाम हळू हळू दिसतील.(स्लो पॉइझनिंग सारखे)
12) हे जसे कॉपर/तांबे च्या बाबतीत आहे तसेच इतर मिनरल च्या बाबतीत देखील म्हणता येईल.
13) एरिया स्पेसिफिक मिनरल मिकश्चर नावाचा एक प्रकार असतो, ज्याच्यात असा प्रकार टाळण्याचा प्रयत्न केलेला असतो. शेळ्यांबाबतीत असे संशोधन कोठे झाल्याचे माझ्या माहितीत नाही.
14) जनावरांचे रक्त लघवी चारा व माती इत्यादींचे परीक्षण करून त्यात कोणती मिनरल कमी/जास्त आहेत त्याचा विचार करून एरिया स्पेसिफिक मिनरल मिकश्चर बनविले जाते. KVK बारामती येथे संकरित गाईंची असे मिनरल मिकश्चर बनविले आहे. परंतु अश्या स्वरूपाच्या उत्पादनास देखील खूप मर्यादा आहेत असे मला वाटते.
15) माझ्या मते एका शेळीला 10 ग्राम पेक्षा जास्त मिनरल मिकश्चर देण्याची आवश्यकता नाही.
16) वरील सर्व विवेचन हे केवळ विचारार्थ आहे, या माहितीचा प्रत्यक्ष उपयोग करायचा असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा असे मी सूचित करतो.
18

1) डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी हा अर्थ शास्त्रातील एक कन्सेप्ट आहे. तस माझं शिक्षण काही अर्थ शास्रातून झालं नाही, त्यामुळे मला या विषयीचे ज्ञान फार जास्त नाही पण तरीही हा कन्सेप्ट शेळी पालनाशी कसा निगडित आहे हे आपणास समजून घेणे उचित ठरेल.
२) आपण दोन उदाहरणे पाहू, उदाहरणे हैपोथेटिकल म्हणजे कल्पनिक आहेत-
:- पहिलं उदा (चित्र 1) पिकामध्ये युरियाचा वापराबाबतचे आहे. समजा एक एकर क्षेत्रामध्ये कांदा हे पीक लावले, त्यास स्तंभ 2 मध्ये दाखवल्या प्रमाणे यूरिया च्या मात्रा दिल्यास येणारे उत्पादन किती मिळेल हे स्तंभ 3 मध्ये दर्शविले आहे.
या उदाहरणात जसे यूरिया वापराचे प्रमाण वाढवत गेलो तसे कांद्याचे उत्पादन देखील वाढत गेले. 15 किलो यूरिया वापरल्यानंतर त्यापासून 400 किलो उत्पादन निघाले, त्यानंतर मात्र उत्पादन वाढले मात्र घटत्या वाढीच्या वेगाने. म्हणजेच जास्तीच्या युरियाची उपयोगिता हळू हळू कमी होत गेली. याला म्हणतात डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. याचा अर्थ असा कि 10 ते 15 किलो युरियाचा वापरातून आपणास जास्तीत जास्त मार्जिन(परतावा) मिळेल. यूरिया आणखी जास्त वापरल्यास कांद्याचे उत्पादन वाढेल पण परतावा कमी कमी होत जाईल.
:- आता दुसरं उदाहरण थेट ज्या साठी हि पोस्ट लिहित आहे त्याचंच घेऊयात. आपण शेळ्यांची करडं कोणत्या वयात विकल्यास आपणास जास्तीत जास्त परतावा मिळेल, ते आपणास पाहायचे आहे. हे उदाहरण अर्थात काल्पनिक आहे, त्यामुळे प्रत्येक शेळी पालकाने या विषयीचा आपला स्वतःचा अभ्यास करावा व त्यानुसार कार्यवाही करावी हे उत्तम.
चित्र 2 मध्ये करडांच्या वयानुसार किती खुराक दिला जातो तसेच करडांचे वजन त्यांच्या वयानुसार किती किलो वाढेल ते दिले आहे. या उदाहरणात पूर्ण वाढ झालेल्या शेळी बोकडचे वजन 50 ते 55 किलो गृहीत धरले आहे. तेंव्हा त्याची पहिल्या 12 महिन्यात त्याच्या एकूण वजनाच्या 65-70 टक्के वजन वाढ होईल असे गृहीत धरले आहे. पाचव्या स्तंभात करडांच्या वयानुसार व नगावर खुल्या बाजारात विक्री केल्यास अंदाजे काय किंमती मिळतात ते दिले आहे. त्यापुढील स्तंभात दोन लगतच्या किमतीतील फरक दाखविला आहे. शेवटच्या स्तंभात खुरकवरील खर्चाने त्या महिन्यातील फरकाला भागले आहे. याचा अर्थ असा कि 1 रु खुराकावर खर्च केल्यास आपणास किती रुपये परतावा मिळेल. म्हणजेच उदा दुसऱ्या महिन्यात 1 रु खर्चून आपणास 67 रु परतावा मिळेल, पाचव्या महिन्यात 1 रु खर्चून आपणास 7.50 रु परतावा मिळेल या प्रमाणे. खर्च म्हणून आपण येथे फक्त खुरकवरील खर्च गृहीत धरला आहे, चारा व व्यवस्थापन या वरील खर्च सध्या बाजूला ठेवला आहे. (तो देखील येथे विचारात घेऊन या उदाहरणाचे मांडणी करता येईल, पण ते किचकट होईल.) पहिल्या व दुसऱ्या महिन्यात करडू पाळण्यासाठी विकले जाते त्या साधारण 1 ते 2 हजार एवढी किंमत मिळते, त्यानंतर ते कापण्यासाठी विकले आहे असे गृहीत धरले आहे.
-शेवटच्या स्तंभावरून आपणास हे लक्षात येईल कि सुरवातीला आपणास जास्त परतावा (67 रु) मिळतो तो त्यानंतर जसे वय वाढेल तसा कमी कमी होत जातो.
- पण स्तंभ क्रं4 मध्ये मात्र वजन वाढत गेले आहे.
- याचाच अर्थ असा कि करडाचे वजन/वय जसे वाढत जाईल तसे त्याच्या खुरकवरील खर्च वाढत जाईल व परतावा कमी होत जाईल.
- 8व्या महिन्यापर्यंत आपणास खुराक घालणे परवडते कारण खर्च नफा गुणोत्तर 1:2.08 असे आहे. त्यानंतर मात्र नफा कमी कमी होत जातो.
- या उदाहरणात प्रस्तुत नियमाचा (डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी) विचार केल्यास करडू 5 -6 महिन्याचे असताना विकल्यास जास्त आर्थिक परतावा मिळेल, असे दिसते.
3) चित्र क्रं 3 मध्ये मुलांचे 0-12 महिने, 1-2 वर्ष,2-3 वर्ष व 3-5 वर्ष या कालावधीत त्यांची वजने कशी असावीत याचे स्टॅण्डर्ड दिले आहेत. या नुसार पहिल्या 12 महिण्यात मुलांची वजने दरमहा किलोने वाढतात व त्यानंतर ती दर महा ग्रॅम ने वाढतात हे दिसून येते.(या आलेखांचा बारकाईने अभ्यास करावा)
4) करडांच्या बाबतीत देखील असा स्टॅण्डर्ड ग्राफ/आलेख कुठे उपलब्द आहे? या विषयी अधिक सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता आहे, असे माझे मत आहे.
5) शेळी/ बोकडाची वाढ त्याच्या वयाच्या 3 वर्षापर्यंत चालू असते. पहिल्या 12 महिन्यात त्याच्या एकूण वजनाच्या 65 ते 70 टक्के वजन वाढ मिळले, त्यानंतर त्याची वजन वाढ सावकाश होईल. असे माझे गृहितक आहे.
6) समजा एखाद्या जातीच्या पूर्ण वाढ झालेल्या शेळी/बोकडचे वजन 55 किलो असेल तर पहिल्या 12 महिन्यात त्याचे वजन 40 किलोच्या आसपास होईल. ते नैसर्गिक व स्वाभाविक आहे. उरलेलं 15 किलो वजन पुढील सुमारे 2 वर्षात हळू हळू वाढेल असं मी मानतो.
7) पहिल्या 6 महिन्यापर्यंत वजन वाढीचा वेग जास्त असावा त्यानंतर तो कमी होत जातो असे )मला वाटते.

8) एकूणच या विषयावर चर्चा करण्यास मला अधिक आनंद वाटेल.






बाळू मोटे बारामती
17

1) या वर्षी मी मेथीघासात एक प्रयोग केला, आणि तो यशस्वी झाला..!(बहुदा माझे बरेच प्रयोग यशस्वी होत नाहीत)
2) मेथी घासात हरळी व लाव्हाळाची फार मोठी समस्या असते. गेली दोन तीन वर्ष ती मी अनुभवली. मी कृषी शाखेचा पदवीधर असल्याने त्यातील ज्ञान मला या कामी उपयोगाला आले.
3) मी ज्या शेतात घास पेरणार होतो त्या शेतात जास्त प्रमाणात हरळी व लव्हाळा होता. जमिनीची वारंवार मशागत करून कितीही हाताने गोळा केला असता तरी पहिल्या 3-4 महिन्यात हराळीने व लव्हाळ्याने मेथी घासाचा गळा घोटला असता.
4) या शेताची मी उन्हाळ्यात मशागत केली नव्हती.(मी उन्हाळ्यात कोणत्याही शेताची कसलीच मशागत करत नाही) जून च्या सुरवातीला पाऊस पडल्यानंतर 10-15 दिवसात हि दोन्ही तणे चांगली वाढली. मग मी ग्लायफोसेट हे तणनाशक पंपास(15 लिटर) 200 मिली (होय200मिली) घेऊन फवारणी केली.
5) त्यानंतर 2-3 दिवसात पुन्हा पाऊस झाला. मग पहिल्या फवारणीच्या 10 दीबसनंतर मी पुन्हा तीच फवारणी परत एकदा घेतली.
6) पुन्हा 10-15 दिवस थांबून मी रानाची पॉवर टिलर ने मशागत केली. दरम्यानच्या काळात सर्व तण मरून गेले होते.
7) मग नेहमीप्रमाणे वाफे काढून मेथीघास पेरून भिजवून घेतला.
8) नेहमीच्या प्रमाणापेक्षा 10 पट जास्त प्रमाणात ग्लायफोसेट वापरले होते. मला वाटत होते कि घासाचे बी आता उगवणार नाही. पण ते व्यवस्थित उगवले. त्याबरोबर हरळी व लव्हाळा सोडून इतर सर्व प्रकारची गवते उगवली.
9) घास उगवून 20 दिवसानंतर मी त्यावर किझोल्फोप इथिल (टरगा सुपर) हे तण नाशक 15 मिली पंपास घेऊन फवारणी केली. एक दोन दुकानदारांना मी याविषयी विचारले तर ते म्हटले कि हे तणनाशक वापरू नका, काही नुकसान झाल्यास आम्ही जबाबदार नाही.
10) साधारण 10 दिवसात जे जास्त प्रमाणात एकदल वर्गीय तणे जसे कि कुंदा, शिपी, लोणा वैगरे होती ती सर्व मरून गेली.
11) आता घासात फक्त द्विदल वर्गीय तणे जसे गाजर गवत, माठ, लाल पानाचे गवत, कुर्डू इ राहिली.
12) घासाची खुरपणी न करता राहिलेल्या गवतासाहित घासाचे जावळ कापून मी सध्या शेळ्यांना खाऊ घालत आहे.
13) गवताची खोडे पुन्हा फुटतात पण त्यांच्यापेक्षा कापलेला घास जास्त वेगाने वाढतो त्यामुळे हि गवते जास्त जोर करत नाहीत.
14) अशा रीतीने खुरपणी शिवाय मी हरळी, लव्हाळा व इतर एकदल वर्गीय तणांचा बंदोबस्त केला.
15) माझा हा प्रयोग आपण करावा अशी मी अजिबात शिफारस करत नाही. जर आपण अश्या पद्धतीने या प्रयोगातील तणनाशके वापरणार असाल, व त्यातून चुकून आपले काही नुकसान झाल्यास मी(बाळू मोटे) त्यास अजिबात जबाबदार नसेन, याची कृपया नोंद घ्यावी.
16) असा प्रयोग आपण केला किंवा करत असाल तर आपली मते मला जरूर कळवा.

बाळू मोटे बारामती
16

1) आमचा वाडा (मेंढरं) राहुरी विद्यापीठातील कॅनॉल वर सन 2004 साली होती. तेथे आम्ही जवळपास 15 ते 20 दिवस होतो. जवळच वांबोरी नावाचे एक गाव आहे, तेथील आसपासच्या एका वस्तीवरील एक शेतकरी आमच्या वाड्यावर आले, त्यांनी सांगितले कि त्यांचा एका शेळीच्या सडातून दुधाच्या गाठी येतायेत.
2) माझी आई मेंढरांकडे असते, ती त्या शेतकर्याच्या घरी गेली आणि त्या शेळीला वळ (कास दाह किंवा मस्टायटीस) झाला होता. सलग 3-4 दिवस आईने त्या शेळीची ट्रीटमेंट केली आणि शेळी बरी झाली. पूर्ववत दूध देऊ लागली.
3) त्या शेतकऱ्याने माझ्या आईसाठी साडी घेऊन तिचा सन्मान केला.
4) वरील उदाहरण सांगायचे काही कारण नव्हते, परंतु नुकताच माझ्या एका शेळीला मस्टायटीस झाला आणि मी प्रथम माझ्या आईकडे त्यासंबंधीच्या उपचारकरिता विचारणा केली.
5) अनुभव हाच गुरू असतो आणि अडाणी माणसे देखील अनुभवाने समृद्ध असतात( बहुदा आपण शिकलेले ते मान्य करत नाही).
6) मस्टायटीस झाला आणि तो योग्य रित्या बरा नाही झाला म्हणजे एक तर शेळीची कास निकामी होते किंवा तिचा एक सड निकामी होतो, दुसरे म्हणजे ती प्रजोत्पादन करते परंतु दूध पाजू शकत नाही. या परिस्थितीत शेळी कमी भावात विकून टाकण्याशिवाय पर्याय राहत नाही.
7) जेंव्हा कासेतून चीक येत असतो तेंव्हा जर करडांची टाळू म्हणजे डोक्याचा माथा जर कसेला लागला म्हणजे धका बसला तर कास कठीण, कडक होते. तो मस्टायटीस नसतो. असं आई सांगते. दुसरं असं कि शेळीच्या किंवा मेंढीच्या सडाला खांडूक होतं. खांडूक म्हणजे सडावर एक विशिष्ट जखम होते. हा देखील मस्टायटीस नसतो. तिसरा प्रकार म्हणजे कासेतून एक किंवा दोन्ही सडातून दुधा ऐवजी सुरवातीला दुधाच्या गाठी, रक्त मिश्रित दुधाच्या गाठी, त्यानंतर रक्त मिश्रित पाणी येते. कास सुजते.
हे सर्व आपणास दिसते आपण समजू शकतो. पण अनुभवी माणसाला आणखी एक लक्षण चेक करावं, ते असं, ज्या ठिकाणी कास शरीराला चिकटलेली असते तिथे एक मोठी शिर मागच्या बाजूने आपणास दिसते. ती शिर सुजते व गाठ तयार होते. मायांगच्या आत देखील एक अशीच शिर असते, ती सुजते व गाठ तयार झाल्यासारखे वाटते.
8) शेळीच्या सडाला खांडूक झालं म्हणजे तिला मस्टायटीस होण्याची सर्वात जास्त शक्यता असते. एरवी शेळीला मस्टायटीस होण्याची शक्यता फारच कमी असते. माझ्या शेळीच्या बाबतीत नेमकं असंच झालं.
9) वळ(मस्टायटीस) झाल्यावर वळ मोडणे हि एक प्रक्रिया असते, ती व्यवस्थित पार पडली म्हणजे कास निकामी होत नाही.
10) सर्व प्रथम दोन्ही सडातील दूध सावकाश पिळून काढावे. हळद, गूळ, तूप, चुना (थोडासा), मीठ(थोडे), व शेळीच्या कासेतील मळ सारख्या प्रमाणात घेऊन त्याचे कणकीसारखे  मिश्रण तयार करावे. त्यातील थोडे घेऊन मायंगात बोट घालून खालच्या बाजूला जी गाठ असते ति चोळावी.
कसेवर जी गाठ असते ती देखील वरून खाली या पद्धतीने चोळावी. कासेला मसाज करावा. असे तीन दिवस दिवसातून एकदा करतात. दूध दिवसातून 2-3 वेळा पिळून काढावे लागते.
11) टायलॉसिन, निओमयसिंन, एन्रोफ्लोक्सासिन इ अँटी बायोटिक शेळीला योग्य मात्रेत टोचावे लागते. शेळीच्या सडात प्रतिजैविक जसे पेडिस्टरीन वैगरे सोडता येत नाही.
12) ताप, कणकनी, ठणक थांबवण्यासाठी निमुसुलाईड, किंवा प्यारासीटमोल ची गोळी किंवा इंजेकशन द्यावे लागते.
13) कासेत इंजेकशन टोचू नये, त्यामुळे कास किंवा सड निकामी होण्याची शक्यता असते.
14) वेखंड पाण्यात उगाळून त्याचा लेप कासेवर पाठीमागील बाजूवर द्यावा. त्याने सड निकामी होत नसल्याचं अनुभव आमचे मेंढपाळ मंडळी सांगतात.
15) सध्या तरी मला डॉक्टर जे उपाय करतात ते माहित नाहीत.
जे मला माझ्या आईने व इतर मेंढपाळ मंडळींनी सांगितले ते मी येथे नमूद केले. हे उपाय स्वतःच्या जबाबदारीवर वापरावेत, कोणत्याही नुकसानीस मी जबाबदार नसेन. यातुन शेळी बरी होणे, पुन्हा दूध देऊ लागणे हे एक मोठे आव्हान असते.
लेखक- बाळू मोटे बारामती
15

मेथी घासामध्ये rl 88 म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठाने एक चांगली जात विकसित केली आहे. तिचं उत्पादन भरपूर मिळतं व ती अमरवेल या तनास प्रतिकार क्षम आहे.

हि जात एकदा लावली कि 3 वर्ष चालते. दर 21 दिवसांनी कापायला येते. इतर जातींपेक्षा या जातीत प्रोटीन चे प्रमाण देखील थोडे जास्त आहे.

बी मिळवण्यासाठी विद्यापीठातील गवत संशोधन केंद्राशी संपर्क साधावा. साधारण 500 ते 800 रु प्रति किलो असा दर असेल.(सध्या मला दर माहित नाही)

माझ्या मते मेथी घास दर वर्षी वेगळ्या शेतात लागवड करावा. त्यामुळे उंदीर, गवत व कमी उत्पादन या त्रासापासून काही प्रामनात मुक्ति मिळते.
14

१) शेळी व मेंढीत मेंढी उत्तम कि शेळी उत्तम, असा प्रश्न मला नेहमी पडतो. बंदिस्त साठी आपण शेळीला जास्त महत्व देतो, कारण तिच्या कडून जास्त मांस उत्पादन व नफा मिळतो असे आपण मानतो. मग फिरसत्या पद्धतीत शेळीपासुन मेंढीपेक्षा जास्त नफा मिळणार हे उघड आहे, मग पारंपरिक मेंढपाळ शेळ्यांचे मोठे कळप का पाळत नाहीत. सरासरी 15 ते 20 शेळ्यांचे कळप दिसतात तर मेंढ्यांच् सरासरी 100 ते 150 चे दिसतात.
२) मेंढी पेक्षा शेळीचं मटण रुचकर, चविष्ट आहे. मेंढीला 1 तर शेळीला 2 पिल्लं होतात. मेंढी पेक्षा शेळीला जास्त दूध असतं. जशी मेंढरपासून लोकर मिळते तशी शेळ्यांपासून देखील लोकर(मोहेर) मिळते. मेंढ्याना fmd लगेच होतो तर शेळ्यांना सहसा होत नाही. बाजारात एकाच वजनाच्या कोकरास व बोकडस कोकरपेक्षा जास्त दर मिळतो. अशी तुलना केली तर बऱ्याच बाबतीत  शेळी मेंढी पेक्षा उजवी ठरते.
3) अस असून देखील धनगर समाजातील मंडळी शेळी पालन करण्यापाइक्षा मेंढी पालन का करतात?
4) चाऱ्याच्या बाबतीत शेळी मेंढी पेक्षा कितीतरी पटीने चोखंदळ आहे. निकृष्ट प्रतीचा चारा खाऊन मेंढ्या स्वतःची गुजराण करू शकतात, शेळ्या नाही. माळावरच वाळलेल गवत ज्वारीच्या शेतातील धसकटे इ खाऊन मेंढ्या चांगल्या राहू शकतात. मेंढ्याना देखील अश्या चाऱ्याचेइ सवय लावावी लागते. सर्वात महत्वाचा गुण म्हणजे मेंढ्या समूहात व्यवस्थित राहतात, त्यांना चांगली शिस्त असते, शेळ्या फार बेशिस्त असतात, जिकडे शेलका शेंडा तिकडे शेळीचा डोळा कायम असतो, ती एका जागेवर चरत नाही. मेंढी वेली कि तासाभरात तिचे कोकरू स्वताहून मेंढीला दूध पिऊ लागते , बऱ्याच वेळा शेळीच्या करडांना 2 ते 3 दिवस दूध पिण्यासाठी आपणास मदत कारावज लागते. माझ्या मते शेळ्यांपेक्षा मेंढ्यांच्या पिल्लांची मरतुक फार कमी होते. जेंव्हा पावसाची झड लागते तेंव्हा भर पावसात मेंढ्या चरू शकतात, लिंब, पिपरण, वड इ पाला अश्या वेळेला धनगर बांधव मेंढ्याना देतात. अश्या वेळेला मेंढ्या अर्ध पोटी उपाशी राहिल्या तरी त्यांच्या ताब्यातीवर वाईट परिणाम कमी प्रामनात होतो, शेळ्या मात्र लगेच खराब होतात. पाऊस शेळ्यांना अजिबात सहन होत नाही, मेंढ्या पावसाला भीत नाहीत. शेळी आजारी पडली कि तिचं चलनवलन बऱ्याच वेळा थांबते, आजारपणात शेळ्या बऱ्याच वेळेला मरतात. मेंढ्या शेळ्यांपेक्षा लवकर आजारी पडतात पण त्यांचे चलनवलन लवकर थांबत नाही, त्या आजाराने लवकर मरत नाहीत. FMd, ppr, इ आजार झालेले एवढंच नव्हे अंथराक्स सारखे आजार झाले तरी मेंढ्या त्यातून बऱ्या होतात. शेळीला साधी बुळकांडी लागली कि शेळी दगावू शकते. शेळीला विष बाधा सहन होत नाही, तिला साधा विंचू चावला तरी शेळी मरू शकते, बऱ्याच वेळेला मरते.

अश्या रीतीने शेळ्यानपेक्षा मेंढ्या फिरस्ती साठी योग्य ठरतात.


बाळू मोटे बारामती


[In reply to शेळी पालन चॅनेल]
मोठ्या शेळ्यांसाठी गव्हाण.

1) सुमारे 8 ते 10 शेळ्या एका गव्हाणीत आरामशीर चरू शकतात.
2) लेंड्या व मुतारी अजिबात आत जात नाही
3) भरपूर चारा टाकता येतो विशेषतः कोरडा किंवा सुका चारा.
4) चारा सांडवता येत नाही
5) स्वच्छता करायला एकदम सोपं
13

१) काल kvk बारामती (कृषी विज्ञान केंद्र) येथे माझे टोमॅटो लागवड व्यवस्थापन व बंदिस्त शेळीपालन या विषयावर व्याख्यान झाले.
२) जून 2014 मध्ये मी kvk मधील नोकरी सोडली आणि त्यानंतर पुन्हा तेथे जाऊन लेक्चर देण्याची हि पहिली वेळ. खूप आनंद वाटला. नोकरीस होतो तेंव्हा दररोज कित्येक शेतकरी बांधवाना, विध्यार्थ्यांना लेक्चर्स, मार्गदर्शन देत होतो, तो तेथील नित्याच्या कामाचा भाग होता. परंतु कालच लेक्चर मला बहिस्थ होतं, आणि मला मी kvk त आता काम करत नसल्याचं जाणीव मला काहीतरी हरवलं असल्यासारखं वाटत आहे.
३) agri clinic agri business management नावाचा manage हैद्राबाद यांचा 2 महिन्याचा कोर्स kvk त चालवला जातो. शेतीशी निगडित कोणकोणते उद्योग कसे करायचे, प्रोजेक्ट रिपोर्ट कसे बनवायचे या विषयी हे प्रशिक्षण असतं. कृषीतुन पदवी किंवा पदविका झालेली लोक यास पात्र असतात. बँकेकडून 20 लाखापार्यंत लोन मिळतं, व त्यावर सरकार 36 टक्क्यापर्यंत अनुदान देतं.
४) प्रशिक्षणास लहान मोठे छोटे मोठे व्यवसाय करणारे कृषी पदवीधर होते.
५) एकूण व्याख्यान चांगलं झालं,त्यांनी भरपूर प्रश्न विचारले.
६) kvk मध्ये मी 6 वर्ष नोकरी केली, त्यासंबंधी पुढील 1-2 पोस्ट मध्ये मी माहिती लिहिणार आहे.
12

१) जितकं जित्राब (पाळीव प्राणी) मोठं तितकं त्याची fecundity (पिल्लाना जन्म देण्याची क्षमता) कमी असते.
२) ज्या जित्राबाची fecundity जास्त असते त्यांच्यात पिल्लांचा नैसर्गिक मृत्यू दर जास्त असतो.
३) जास्त पिल्लं देणाऱ्या प्राण्यांचा गर्भार काळ कमी दिवसाचा तर कमी पिल्लं देणाऱ्या प्राण्याचा गर्भार काळ जास्त दिवसाचा असतो.
४) जास्त पिल्लं देणारे प्राणी आकारमानाने व वजनाने लहान लहान होत जातात तर कमी पिल्लं देणारे प्राणी आकारमानाने व वजनाने मोठे मोठे होत जातात.
५) जितका प्राणी लहान तितका माणसाच्या खाण्याच्या दृष्टीने चवीला छान तर जितका प्राणी मोठा तितकं त्याची चव कमी होत जात. (या विधानस खूप मर्यादा आहेत)
६) वरील 5 विधाने हि निसर्ग नियम आहेत असे माझे वैक्तिक मत आहेत, अर्थात त्यास काही मर्यादा देखील असतील.
७) शेळीच्या बाबतीत या 5 विधानांचा प्रकर्षाने विचार व्हावा असे मला वाटते.
८) जगभरात शेळी हा एकच प्राणी आहे, वेगवेगळ्या जातीनुसार त्यांची fecundity वेगवेगळी आहे हे आपण पाहतो.
९) जितकी शेळीची जात आकारमानाने मोठी, वजनाने मोठी तितकी तिचे जुळे देण्याचे प्रमाण कमी असते असे मला वाटते. या उलट आकारमानाने लहान असणाऱ्या शेळ्यांच्या जातीत जुळे देण्याचे प्रमाण जास्त असते.
१०) सिरोही या आकाराने मोठ्या जातीच्या शेळी मध्ये जुळे देण्याचे प्रमाण 9 ते 12 टक्के आहे. तर ब्लॅक बंगाल या आकाराने व वजनाने लहान असणाऱ्या शेळीच्या जातीत जुळे देण्याचे प्रमाण जगात सर्वात जास्त आहे.
११) शेळीची जात कोणतीही असो तिचे आकारमान व वजन जास्त असेल तर तिची fecundity कमी असणार हे निश्चित समजायला हवे.
१२) अश्या मोठ्या शेळ्यांमध्ये जुळे देण्याचे प्रमाण चांगले आहार व्यवस्थापन व आरोग्य व्यवस्थापन करून एका मर्यादे पर्यंत वाढविता येउ शकते. पण त्याला बांधीत मध्ये खूप मर्यादा पडतात असे मला वाटते.
१३) या पोस्ट संदर्भात आपली मते कळवावेत.
11

१) करडाचे जन्मतः वजन जास्त मिळावे या साठी काही विशेष प्रयत्न करायला सांगितले जातात. त्यातले दोन खालील प्रमाणे-
- शेवटच्या 6 आठवड्यात शेळीला जास्तीचा खुराक देणे
- जातिवंत बोकड लागवडीस वापरणे
२) करडाचे जन्मतः वजन जास्तीत जास्त मिळावे हि चांगलीच गोष्ट आहे; पण याला काही मर्यादा नाहीत का?
३) मला वाटते नैसर्गिक रित्या जे काही करडाचे जन्मतः वजन मिळेल ते चांगले. असे वजन हे साधारण 1.5 किलो ते 4 किलो पर्यंत मिळू शकते.
४) करडाचे जन्मतः वजन हे शेळीच्या आकारमनावर व कॅपॅसिटीवर अवलंबून आहे. एखादी शेळी आकारमानाने, उंचीने छातीच्या घेराने लहान असेल तर तिला काय 3.5 किलो वाजनाचे करडू व्हावे का? आपणस तर 2 करडे हवी असतात, मग तिला 3.5 चे 2 व्हावीत का? शक्यच नाही. तिच्या आकारमानानुसार तिला 1.5 किलोची 2 किंवा 2 ते 2.5 किलोचे एक किंवा फार फार तर 2 किलोची 2 होतील.
५) जन्मतः चे वजन वाढविण्यात लागवडीच्या बोकडाचा काही संबंध नसतो असे मला वाटते कारण शेळी करडाला जन्माला घालणार असते, बोकड नाही. जन्म झाल्यानंतर बोकडाच्या अनुवंशिकतेनुसार करडाचे वजन किती वाढायचे ते ठरेल.
६) शास्त्रा प्रमाणे शेवटच्या 6 आठवड्यात पोटातील पिल्लांची 70 टक्के वाढ होते याचा अर्थ त्या अगोदर फक्त 30 टक्के वाढ होते.
७) समजा एका शेळीला एकच 3 किलो वाजनाचे करडू झाले. म्हणजे त्या करडाचे लागवडीपासून 5 महिन्यात फक्त 3 किलो वजन झाले. करडू जन्मल्यानंतर दर महिन्याला 4 ते 5 किलोने वाढते.
८) याचा अर्थ असा कि शेळी गाभण असताना ती स्वतःचे वजन वाढवते व करडाचे वजन तिच्या आकारमानानुसार वाढवते जेणे करून तिला प्रसुती मध्ये करडास जन्म देणे सोईस्कर होईल.
९) याचा पुढील अर्थ असा कि शेवटचा 6 आठवड्यात जरी जास्तीचा खुराक दिला तरी करडाचे फार वजन वाढणार नाही.
प्रथम शेळीचे वजन वाढेल, त्यानंतरचा जास्तीचा खुराक वय जाईल.
१०) उदा पाहू. एका शेळीचं जास्तीत जास्त वजन समजा 50 किलो आहे. आधीच्या वितात तिचं वजन घटून समज 45 किलो झालं. आता या शेळीची लागवड केल्यानंतर तीच वजन वाढायला सुरवात होईल. दर महिन्याला समजा 4 किलो वजन वाढ धरली तर 40 दिवसात तिचं वजन पुन्हा 50 किलो होईल. उरलेल्या सुमार 4 महिण्यात 2 करडाचे वजन जास्तीत जास्त 8 किलो होईल. म्हणजे आहे त्या खुराकात शेळीचं भागून करडांचे वजन देखील व्यवस्थित होईल.
११) जर शेळीच्या वजन घटीच्या काळात तिचं वजन घटू दिलं नाही तर वजन वाढीच्या काळात जास्तीचा खुराक देण्याची वेळ येणार नाही.
१२) माझा हा विचार आपणस पटत नसेल तर कृपया सोदाहरण स्पस्ट करून कळवावे हि विनंती.

लेखक- बाळू मोटे.