करडांची खुल्या बाजारात विक्री:-
१) शेळी पालन प्रकल्प सुरु करताना आपण शेळी पासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा हिशोब केलेला असतो. त्यात आपण करडांची विक्री रु 200 प्रति किलो या दराने गृहीत धरतो.२) पण प्रत्यक्ष बाजारात काय होते...!
३) तीन महिने वयाच्या करडाचे सरासरी वजन 13 किलो भरते असे मानल्यास आपणास 13x200= 2600 रु मिळायला हवेत.
४) यात आपण शेळ्या खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा नफा गृहीत धरत नाही.
५) रु 2600 किमतेचे 13 किलो वजनाचे करडू खरेदी करून व्यापर्यास किती नफा होईल हे पहिले पाहिजे. 13 किलो जिवंत वजन असेल तर ते करडू कापल्यानंतर त्याच्या जिवंत वजनाच्या 50 ते 55 टक्के मटण मिळते. (कातडी, खूर- मुंडी इ पासून मिळणारे उत्पन्न वेगळे). म्हणजेच 13 च्या 50 टक्के म्हणजे 6.5 किलो मटण मिळेल. 6.5 x 400 रु = 2600 रु.
६) म्हणजेच रु 200 दराने व्यापारी करडू खरेदी करणार नाही, कारण त्यात त्याचा कोणताही नफा नाही.
7) व्यापारी करडू पाहून, त्याच्या कमरेवर हात टाकून त्याचे पासून अंदाजे किती मटण मिळेल हे बघतात. त्या हिशोबाने ज्या दरास त्यांना खरेदी करावयाचे आहे त्याच्या निम्म्या किमतीपासून बोली सुरु करतात.
८) वरील उदाहरणात 13 किलो जिवंत वजन असलेले करडू ते रु 800 प्रति नग या दराने मागावयास सुरवात करतात.
9) बाजारात मालाची किती आवक आहे त्या हिशोबाने अंतिम दर ठरवला जातो.
१०) बाजारात जर जास्त माल आला असेल तर ते 13 किलोचे करडू रु 1700 ते रु 1800 या दरात खरेदी करतात. त्या पेक्षा जास्त दर मिळत नाही. म्हणजेच त्यांना 2600 -1800= 800 रु नफा एका करडपासून होईल.
११) जर बाजारात मालाची म्हणजेच करडांची व शेळ्यांची आवक कमी असेल तर ते 13 किलो वजनाचे करडू जास्तीत जास्त 2100 रु दराने खरेदी करू शकतात. म्हणजेच एका करडा पासून त्यांना 2600- 2100=500 रु नफा होऊ शकतो.
१२) तेंव्हा शेळी पालन प्रकल्प अहवाल तयार करताना या बाबींचा विचार होणे आवश्यक आहे.
१३) करडांची किंमत तजेलदार पणा, मांसाचे व चारबीचे प्रमाण या वर देखील अवलंबून असते.
टीप:- हा माझा वैक्तिक अनुभव आहे. मी चाकण, तळेगाव, बेल्हा, शिरूर लोणंद या ठिकाणच्या शेळी मेंढी बाजारात गेल्या 15 वर्षयांपासून कोकरांची व कारडांची विक्री करण्यास नेहमी जात असतो.
--- बाळू मोटे, बारामती (9422512680)
No comments:
Post a Comment