Monday, October 12, 2020

FAQ...8

 FAQ...8


बंदिस्त शेळ्यांना कोणत्या लसी द्याव्यात?


उत्तर:-

१) तसे पाहिले तर जवळपास सर्वच लसी शेळ्यांना देऊन घेणे जास्त उपयोगाचे आहे परंतु आपल्याकडील प्रत्यक्ष परिस्थिती पाहून लसीकर्णाचा कार्यक्रम आपण स्वतः ठरवून घ्यावा.

२) आपल्या बंदिस्त फार्म वर वेगवेगळ्या मार्गाने कोणकोणत्या रोगांचा प्रसार होऊ शकतो याचा सारासार विचार करावा व उपलब्ध वेलपत्रकाच्या हिशोबाने आपला लसीकरण कार्यक्रम बनवून तो दर वर्षी काळजीपूर्वक राबवावा.

३) ज्या फार्म वर इतर प्राण्यांची वर्दळ कमी प्रमाणात असते त्या ठिकाणी ठराविक महत्वाच्या लसी अवश्य देऊन घ्यावायत. ज्या रोगामध्ये जनावर उपचार करण्यास अजिबात वेळ देत नाही अश्या रोगांच्या लसी जाणीवपूर्वक इतर कोणतीही कारणे लक्षात न घेता अवश्य देऊन घ्यावायत. त्यानंतर जे रोग जास्त सांसर्गिक आहेत, अशा रोगांच्या लसी सुद्धा देऊन घ्याव्यात.

४) आपल्या भागात किंवा परिसरात जे रोग आढळत नाहीत किंवा 2ते 3वर्षा पूर्वी त्या रोगाची साथ आली नाही अशा रोगांच्या लसी दिल्या नाही तरी चालते. उदा. अंथराक्स, देवी, fmd, ब्लु टंग इ

५) माझ्या मते et, hs व ppr या लसी दर वर्षी न चुकता द्याव्यात. लसीकरणाची सुरवात मे महिन्यापासून करावी व दर महिन्यास एक एक लस देत जावी.

६) लसीकरणाची वेळापत्रक प्राप्त करून घ्यावे, त्याची मोठी प्रिंट काढून घरातील भिंतीवर लावून ठेवावे.

७) कोणती लस कशी घ्यावी याची योग्य माहिती प्रत्यक्ष पशुवैद्यक तज्ज्ञांकडून प्राप्त करून घ्यावी.

८) लसी च्या स्वरूपामध्ये किंवा डोस मध्ये काही बदल झाला आहे का याची खात्री करून घ्यावी.

९) लस ही पूर्णतः शीत साखळी तुन उपलब्ध झाली आहे का हे तपासावे व आपण देखील प्रत्यक्ष फार्म वर शितसाखळी मेंटेन करावी.

१०) लसीकरणापूर्वी जंतनाशक औषध किमान 21 दिवस अगोदर दिलेले असावे.

- सौजन्य- शेळ्यांचे आहारशास्त्र ग्रुप, संकलन - बाळू मोटे, बारामती.

FAQ...7

 FAQ...7


शेळ्यांसाठी कोणते लिव्हर टॉनिक द्यावे व किती प्रमाणात द्यावे?

उत्तर:-
१) शेळी हा नैसर्गिक व कृत्रिम निवड पद्धतीतून (मर्यादित अर्थाने) तयार झालेला व चांगल्या प्रकारे अनुकूलन झालेला एक काटक, निरोगी व कठीण वातावरणीय परिस्थितीत तगून राहणार पाळीव प्राणी आहे.

२) शेळीस चांगला चारा व पुरेसा व्यायाम मिळाला तर कोणत्याही प्रकारच्या टॉनिक ची, लिव्हर टॉनिक ची व खुरकाची आवश्यकता नसते. परंतु अलीकडच्या काळात शेळीस चांगला सकस चारा व चाऱ्यात विविधता मिळणे मुश्किल झाले आहे. तसेच शेळी बंदिस्त केल्याने व्यायाम मिळने देखील अवघड झाले आहे. 

३) वातावरण चा ट्रेस व प्रथिनांच्या आहारातील कमतरतेमुळे शेळ्यांची तब्येत खराब होते. तसेच वाढत्या जंतप्रदुर्भावामुळे शेळ्या खराब होतात. 

४) वरील सर्व कारणांसाठी लिव्हर टॉनिक सुचविले जाते. लिव्हर टॉनिक पाजल्याने शेळीस जास्त भूक लागते व त्यायोगे वजनवाढ होते असा दावा आहे. 

५) लिव्हर टॉनिक मधील प्रमुख घटक हा लिव्हर चा अर्क व अल्कोहोल असते. तसेच यात व्हिटॅमिन B देखील असते.

६) जर शेळ्यांना आपण चांगला चारा व खुराक देत असू तर आणि त्यांची तब्येत व्यवस्थित असेल तर कोणत्याही प्रकारचे लिव्हर टॉनिक देण्याची आवश्यकता नाही.

७) नैसर्गिक रित्या शेळीला तेवढी ताकद असते की ती तिचे लिव्हर चांगल्या प्रकारे मेंटेन करेल, म्हणूनच ती काटक आणि सुदृढ असते.

८) आजारातून उठलेल्या शेळ्यांना मात्र आपण लिव्हर टॉनिक देऊ शकतो.
- सौजन्य- शेळ्यांचे आहारशास्त्र ग्रुप, संकलन - बाळू मोटे, बारामती.

FAQ...6

 FAQ...6


करडांच्या वजन वाढीसाठी कोणते टॉनिक द्यावे?


उत्तर:-

१) शेळ्यांच्या आहारशास्त्र या व्हाट्स अप ग्रुप वर टॉनिक बाबत अनेक वेळा सखोल चर्चा झाली आहे, त्या सर्व चर्चेचा सार म्हणजे कोणतंही टॉनिक कटिंग च्या पिल्लामध्ये वापरणे आर्थिक दृष्ट्या परवडत नाही.

२) पिल्लांमध्ये टॉनिक च्या वापराने जी वजन वाढ मिळते; त्यासाठी जेवढा खर्च येतो त्याचा हिशोब करता टॉनिक वापरणे परवडत नाही असे प्रॅक्टिकली ग्रुप मधील अनेक शेळीपालकाना आढळून आले आहे.

३) कोणत्याही प्रकारचे टॉनिक हे निरोगी व उत्तम वजन वाढ मिळत असलेल्या पिल्लाना वापरणे काहीच उपयोगाचे नाही. उलटपक्षी ज्या पिल्लाचे वजन वाढ काही कारणामुळे मिळत नाही किंवा आजारपणामुळे पिल्लाची तब्येत खराब झाली आहे अशा पिल्लाना टॉनिक देने योग्य आहे.

४) टॉनिक मध्ये विशेषत्वाने कॅल्शियम व फॉस्फोरस हे घटक असतात , या बरोबरीने काही व्हिटॅमिन्स व मिनरल्स असतात. तसेच काही विशिष्ट अमायनो ऍसिड चे कॉम्बिनेशन सुद्धा त्यात असते. या सर्वांचा उपयोग आजारातून उठलेल्या पिल्लांच्या वाजनावाढीसाठी उपयोग होऊ शकतो. परंतु प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडे आशा टॉनिक चा वापर करून वजन वाढ मिळाली असा मोठ्या प्रमाणात डेटा उपलब्ध नाही. 

५) वजन वाढीसाठी चांगला चारा व विशेषत्वाने चांगला खुराक देने जास्त उपयुक्त आहे.

६) जेंव्हा चांगला खुराक मुबलक प्रमाणात पिल्लास उपलब्ध केला जातो आणि अशा वेळेस जर टॉनिक देत असू तर मिळणार फायदा हा टॉनिक चा नसून दिल्या जाणाऱ्या खुराक चा आहे असे समजावे.

७) करडांना धान्य जसे मका, गहू इ खुराक म्हणून देताना त्या पिल्लास कॅल्शियम व फॉस्फोरस ची कमतरता निर्माण होते, हे टाळण्यासाठी मिनरल मिकचर देने जास्त योग्य व परवडण्यासारखे आहे. जर मिनरल मिकचर देने शक्य नसेल तर कॅल्शियम फॉस्फोरस चे टॉनिक पाजावे.

८) कोणतंही टॉनिक किती प्रमाणात पाजावे हे त्या कंपनीने त्या बॉटल वर लिहिलेले असते. त्या कंपनीने त्या टॉनिक च्या ज्या ट्रायल घेतलेल्या असतात किंवा जे प्रयोग केलेले असतात त्या प्रमाणे त्यांनी त्याचे प्रमाण व कालावधी निश्चित केलेला असतो.

९) 3 महिने वयाच्या आतील पिल्लाना पुरेसे दूध मिळत असेल तर कोणतेही टॉनिक पाजायची आवश्यकता नाही. 3 महिने झाल्यानंतर चांगला खुरकसोबत मिनरल मिकचर चालू करणे हे केंव्हाही फायद्याचे आहे.

१०) टॉनिक बाबत कंपनी व त्यांच्या प्रतिनिधी कडून जे मार्केटिंग केले जाते त्यास बळी न पडता सारासार विचार करून टॉनिक वापराबाबत स्वतः अभ्यास करावा व त्याचा गरजेपुरता वापर करावा.

- सौजन्य- शेळ्यांचे आहारशास्त्र ग्रुप, संकलन - बाळू मोटे, बारामती.

FAQ...5

 FAQ...5


बंदिस्त शेळ्यांना खुराकामध्ये सरकी पेंड देणे कितपत योग्य आहे?

उत्तर:-
१) सरकी पेंड मध्ये सुमारे 22 टक्के क्रूड प्रथिने असतात, त्यामुळे सरकी पेंड शेळ्यांसाठी एक उत्तम खुराक घटक आहे.

२) सरकी पेंडीत गॉसिपोल नावाचा एक भयंकर अँटी नुत्रीशनल घटक असतो. 

३) जास्त प्रमाणात सरकी पेंड खाऊ घातल्यास यातील गॉसिपोल मुळे शेळ्या लवकर माजावर येत नाहीत, वारंवार उलटतात तसेच गाभण शेळ्या गाभडतात असे प्रॅक्टिकली आढळून आले आहे. 

४) शास्त्रीय दृष्ट्या सरकी पेंड खाऊ घालायची असल्यास सलग 20 दिवस सरकी पेंड खाऊ घालावी व पुन्हा 20 दिवसांचा गॅप देऊन पुन्हा 20 दिवस खाऊ घालावी अशी पद्धत आहे. 

५) गॉसिपोल मुळे नर बोकडमध्ये कायमचे वंध्यत्व किंवा काही काळापुरते वंध्यत्व येऊ शकते. त्यामुळे लागवडीच्या बोकडास सरकी पेंड अजिबात खाऊ घालू नये. ईद चे बोकड व विक्री करावयाची पिल्ले यांना सरकी पेंड खाऊ घालावी.

६) एका 40 किलो वजनाच्या शेळीस 100 ग्राम पर्यंत सरकी पेंड खाऊ घालता येते परंतु या साठी शेळीस हळू हळू सवय लावावी लागते. 

- सौजन्य- शेळ्यांचे आहारशास्त्र ग्रुप, संकलन - बाळू मोटे, बारामती.

FAQ...4

 FAQ...4


बंदिस्त शेळीस खुरकामध्ये सोयाबीन बी देने योग्य आहे का व किती प्रमाणात द्यावे?


उत्तर:-

१) सोयाबीन बी मध्ये भरपूर क्रूड प्रोटीन म्हणजे प्रथिने असतात. सुमारे 30 टक्के प्रथिने असतात. या मुळे सोयाबीन शेळ्यांसाठी उत्तम खुराक घटक आहे, परंतु सोयाबिन बी शेळ्यांना खाऊ घालण्यात बऱ्याच अडचणी आहेत.

२) सोयाबीन बी मध्ये काही अँटी नुत्रीशनल घटक असतात ज्याच्या मुळे सोयाबीन खुराक म्हणून देऊन देखील आपणास हवा तो फायदा मिळत नाही. शेळीच्या शरीरात प्रोटीन बनविण्याची जी प्रक्रिया चालते त्या प्रक्रियेत सोयाबीन बी मधील प्रोटीन इनहीबिटर नावाचे घटक ज्यास ट्रिपसिंन इनहीबिटर असेही म्हणतात ते बाधा आणतात व त्यामुळे शेळीस प्राणिजन्य प्रथिनांची पुरेशा प्रमाणात निर्मिती करता येत नाही. 

३) हे टाळण्यासाठी सोयाबीन बी भाजून शेळीस खाऊ घालणे असा शास्त्रीय पर्याय आहे. आपण जसे हरभरे भाजून खातो तसे सोयाबीन तव्यावर किंवा मोठ्या कढईत भाजावे व थंड झाल्यावर खुराक म्हणून शेळ्यांना आपण खाऊ घालू शकतो.

४) सोयाबीन बी मध्ये फायटोइस्ट्रोजन नावाचा आणखी एक घटक असतो ज्या मुळे शेळ्या गाभडू शकतात. म्हणून मोठ्या प्रमाणात सोयाबीन बी शेळ्यांना खाऊ घालणे विशेषतः गाभण काळात हे धोक्याचे आहे.

५) एका 40 किलो वजनाच्या शेळीस 50 ते 100 ग्राम भाजलेले सोयाबीन बी खाऊ घालू शकतो. शेळीस कोणता चारा व इतर खुराक दिला जात आहे त्यावर त्या शेळीस किती सोयाबीन बी खाऊ घालायचे हे ठरवावे लागते.

६) सोयाबीन बी पेक्षा सोयाबीन मिल किंवा सोयाबीन पेंड जास्त योग्य आहे, या मध्ये 40 टक्के पर्यंत क्रूड प्रोटीन म्हणजेच प्रथिने असतात. सामान्य शेतकऱ्यास सोयाबीन पेंड मिळणे थोडे अवघड जरी असले तरी सोयाबीन बी पेक्षा सोयाबीन पेंड नक्कीच जास्त लाभदायक आहे. असे असले तरी सोयाबीन पेंड किंवा सोयमिल गाभण शेळीस वापरणे जास्त योग्य नाही.

७) सोयाबीन पेंडीचा करडांच्या वजन वाढीमध्ये शेंगदाणा पेंडीपेक्षा जास्त चांगला फायदा झाल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे. ईद चे बोकड व विक्री साठी ठेवलेली करडे यांस सोयाबीन पेंड अवश्य वापरावी.

- सौजन्य- शेळ्यांचे आहारशास्त्र ग्रुप, संकलन - बाळू मोटे, बारामती.

Sunday, October 11, 2020

Phenylalanine फिनिललालनाईन

 ७

Phenylalanine फिनिललालनाईन

१) फिनिललालनाईन हे एक आवश्यक अमिनो आम्ल आहे.
2) याचे पासून tyrosine टायरोसीन नावाचे दुसरे अमायनो ऍसिड बनविण्यास मदत होते.
3) द्विदल वर्गीय पिके व मांस आणि मासे या मध्ये फिनिललालनाईन हे अमायनो ऍसिड मुबलक मिळते.
4) मेलनीन melanin नावाचे त्वचेतील एक पिगमेंट/रंगद्रव्य बनविण्यामध्ये फिनिललालनाईन चा महत्वाचा सहभाग आहे.
5) ट्रेस कमी करण्यामध्ये महत्वाची भूमिका आहे.
6) चेता संस्थेतील सिग्नल वाहनांमध्ये देखील फिनिललालनाईन चा महत्वाचा भाग आहे.
7) मानवामध्ये ज्या व्यक्तीस phenylkleptonuria फिनिलकलेप्टोनुरिया नावाचा आजार आहे त्या व्यक्ती मध्ये फिनिललालनाईन चे वाईट परिणाम आढळून येतात.
8) फिनिललालनाईन पासून शरीरात dopamine डोपामाईन तयार होते ज्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढते किंवा रक्तदाब नियंत्रणात राहतो किंवा मेंटेन होतो.
9) फिनिललालनाईन शरीरात पेनकिलर चे सुद्धा कार्य करते.
- बाळू मोटे, बारामती, 9422512680.

FAQ...3

 FAQ...3


बंदिस्त शेळीस खुरकामध्ये मका बी द्यावे का? व किती प्रमाणात द्यावे?

उत्तर:-
१) मका बी मध्ये किंवा मका भरडा मध्ये सुमारे 9 ते 12 टक्के क्रूड प्रोटीन म्हणजेच प्रथिने असतात तर सुमारे 75 ते 80 टक्के पचणीय पदार्थ असतात. मका बियातून शेळीस मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते, ही ऊर्जा स्टार्च च्या स्वरूपात साठवलेली असते.
२) शेळीस स्टार्च पचवणे थोडे अवघड जाते, म्हणूनच मकेपेक्षा गहू, ज्वारी किंवा बाजरी पचण्यास हलकी असते. परंतु गहू, बाजरी किंवा ज्वारी पेक्षा मका बियातून शेळीस जास्त ऊर्जा उपलब्ध होत असते.
३) जर हिरवा चाऱ्या मध्ये मका पिकाचा समावेश असेल तर खुरकात मका बी अजिबात नाही दिले तरी चालते. किंबहुना फार कमी द्यावे किंवा देऊच नये.
४) मका बी खुरकात वापरल्यामुळे काही प्रमाणात प्रथिनांच्या पचणीयतेवर परिणाम होतो तसेच कॅल्शियम चयापचयवर परिणाम होतो. म्हणून मका बी आहारात वापरताना काळजी घ्यावी.
५) एका 40 किलो वजनाच्या शेळीस दिवसभरात 100 ग्राम पेक्षा जास्त मका शक्यतो देऊ नये. गाभण शेळीस मका बी किंवा भरडा देण्याचे पूर्णतः टाळावे. असे आढळून आले आहे की गाभण काळात मका बी जास्त प्रमाणात दिल्यास शेळी गाभडते.
६) शेळी विल्यानंतर शेळीस जो जास्तीचा खुराक आपण देतो त्या मध्ये मका बी वापरू शकतो. त्यामुळे शेळीस दूध वाढण्यास चालना मिळते.
- सौजन्य- शेळ्यांचे आहारशास्त्र ग्रुप, संकलन - बाळू मोटे, बारामती.

FAQ...2

 FAQ...2


बंदिस्त शेळीस कोणता खुराक द्यावा?

उत्तर:-
१) खुराक द्यायचा असेल तर शेळीस कोणत्या प्रकारचा चारा देत आहात व त्यातून कोणत्या प्रकारचे अन्नघटक शेळीस किती प्रमाणात मिळतात याचा विचार करून कोणत्या प्रकारचा खुराक किती प्रमाणात द्यायचा हे ठरवावे लागते.
२) खुराक तयार करताना त्यात उपयोगात आणावयाचे घटक असे निवडावेत जेणेकरून त्यातून चारा पिकातून न मिळणारे अन्नघटक मिळतील.
३) जर चारा पिकात एकदल वर्गीय पिकांचा समावेश एकूण आहाराच्या 50 टक्के पेक्षा जास्त असेल तर खुराक घटकात जास्तीत जास्त द्विदल वर्गीय खुराक घटकांचा समावेश करावा.
४) जर चारा पिकात द्विदल वर्गीय पिकांचा समावेश एकूण आहाराच्या 50 टक्के पेक्षा जास्त असेल तर खुराक घटकात एकदल आणि द्विदल खुराक घटकांचा समावेश करावा.
५) विलेल्या शेळीस विल्यानंतर 2 महिने जास्तीचा खुराक द्यावा.
६) खुराक घटकात मका, गहू, तूर चुणी, हरभरा चुणी, उडीद चुणी, गहू भुसा (कोंडा), तांदूळ कोंडा, शेंगदाणा, करडई, सूर्यफूल,तीळ इ तेलबियांच्या पेंडीचा समावेश करावा.
७) खुराक घटक निवडताना उपलब्धता, किंमत व त्यातून उपलब्ध होणारे अन्नघटक यांचा विचार करून खुराक तयार करावा.
८) शक्यतो खुराकामध्येच मिनरल मिकचर मिसळून द्यावे व खुराक दररोज घरच्या घरी ताजा बनवावा व लगेच शेळ्यांना खाऊ घालावा.
- सौजन्य- शेळ्यांचे आहारशास्त्र ग्रुप, संकलन - बाळू मोटे, बारामती.

FAQ...1

 FAQ...1


शेळ्यांनामधील गोचीड व पिसवांचे नियंत्रण कसे करावे?

उत्तर:-
१) गोचीड व पिसवा/ तांबवा/ सुळे या बाह्य परजीवी कीटकांचे नियंत्रण एकात्मिक पद्धतीने चांगल्या प्रकारे करता येते. यात स्वच्छता, नैसर्गिक व जैविक औषधांचा वापर, रासायनिक औषध चा वापर, जंतांशकाचा वापर आणि कोंबडीच्या माध्यमातून नियंत्रण करता येते.
२) गोठ्याची साफसफाई चांगली ठेवावी, गोठ्यात भरपूर सूर्यप्रकाश येईल अशी रचना करावी. गरज असेल तर गोठ्याचा पृष्ठभाग जाळून घ्यावा किंवा रासायनिक औषधांचा फवारा द्यावा.
३) तंबाखू, निंबोळी, करंज इ वनस्पती व बियांचा अर्क काढून त्या द्वारे नियंत्रण करता येते. या अर्काचा वापर शेळीस अंघोळ घालण्यासाठी व गोठ्यात फावरण्यासाठी करता येतो. 4 टक्के तीव्रतेचा अर्क बनवून वापरता येतो. तसेच बाजारात मिळणारे शाम्पू जसे मेडिकेयर शाम्पू ने शेळीस अंघोळ घातल्यास नियंत्रण मिळते.
४) बिव्हेरिया व व्हर्टिसिलियाम नावाच्या दोन बुरशी कृषी विज्ञान केंद्र किंवा कृषी महाविद्यालय/विद्यापीठ किंवा कृषी संशोधन केंद्र येथे उपलब्ध असते. या मित्र बुरशीचा 25 ते 50 ग्राम प्रति पंप या प्रमाणात द्रावण करून शेळीच्या अंगावर व गोठ्यात सर्व ठिकाणी फवारा करता येतो. अशी फवारणी ज्या वेळेस बाह्य परजीवींचे प्रमाण जास्त असते त्या वेळी जरूर करून घ्यावी किंवा वर्षातून किमान दोन वेळा करावी.
५) रासायनिक औषधामध्ये सायपेरमेथ्रीन, डेल्टामेथ्रीन, अमित्रझ इ औषधे फवारणी साठी 1 लिटर पाण्यात 1 मिली या प्रमाणात घेऊन शेळीच्या अंगावर व्यवस्थित फवारावे. तसेच ही औषधे 2 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून शेळीस अंघोळ घालता येते किंवा आशा पाण्याच्या हौदात शेळ्या बुडवून घेता येतात. औषधी द्रावणात शेळ्या बुडावल्यास चांगले परिणाम मिळतात. आशा प्रकारची उपाय योजना वर्षातून किमान 2 वेळा चांगला प्रखर सूर्यप्रकाश असताना करावी. वरील पैकी एका वेळी कोणतेही एकच औषध वापरावे.
६) एव्हरमेकटींन ivermectin या जंतांनाशकाचा उपयोग गोचीड व पिसवांच्या नियंत्रणासाठी देखील केला जातो. याचे इंजेक्शन 1 मिली मोठ्या शेळीस कातडी खाली देतात. या प्रमाणे वर्षातून किमान 2 वेळा इंजेक्शन टोचून घ्यावे. चांगल्या क्षमतेचे किंवा परिणामकारकता असलेले जसे हायटेक f, हायटेक प्लॅटिनम किंवा लायमेक वैगरे टोचावे. एव्हरमेकटींन तोंडावाटे देखील देतात. त्याने सुद्धा गोचीड पिसवा नियंत्रण होते. एव्हरमेकटींन प्रमाणे closantel क्लोजनटेल हे औषध सुद्धा वापरता येते.
७) 50 शेळ्यांमागे 4 कोंबड्या गोठ्यात ठेवाव्यात, कोंबड्या शेळ्यांच्या अंगावरील व गोठ्यातील गोचीड खातात.
८) गोचीड व पिसवांचे नियंत्रण करण्यासाठी स्वतः अभ्यास करून व पशुवैद्यक तज्ज्ञांची मदत घेऊन वर्षभराचे एक सर्वसाधारण वेळापत्रक तयार करावे.
- सौजन्य- शेळ्यांचे आहारशास्त्र ग्रुप, संकलन - बाळू मोटे, बारामती. 

Arginine अर्जिनाईन

 ६

Arginine अर्जिनाईन


1) अर्जिनाईन हे एक आवश्यक अमायनो ऍसिड आहे जे शेळीच्या शरीरात तयार होत नाही. माणसामध्ये लहान बाळामध्ये अर्जिनाईन चे विशेष महत्व आहे. 

2) हृदयाचे काम, रक्ताभिसरण आणि रोग प्रतिकार शक्ती या मध्ये अर्जिनाईन चे महत्व आहे. 

3) शरीरात निर्माण होणारी वाढ संप्रेरके आणि इन्सुलिन यांच्या कार्यामध्ये अर्जिनाईन चे महत्वाचे काम आहे.

4) नर प्राण्यांमधील लैंगिक उत्तेजना चे कार्य सुरळीत चालण्यासाठी देखील अर्जिनाईन महत्वाचे असते.

5) मासे आणि मांस तसेच द्विदल वर्गीय पिकांमध्ये अर्जिनाईन उपलब्ध असते.

6) मोठ्या वयाच्या प्राण्यांमध्ये अर्जिनाईन काही प्रमाणात glutamine ग्लुटॅमिन आणि citrulline सितृलीन यांचे पासून बनविले जाते.

- बाळू मोटे, बारामती, 9422512680

Saturday, October 10, 2020

Cysteine सिस्टीन

 ५

Cysteine सिस्टीन


1) सिस्टीन हे दुसरे महत्वाचे सल्फर घटक असलेले अमायनो ऍसिड आहे, जे शेळीच्या शरीरात बनविले जात नाही.

2) सिस्टीन पासून taurine टावरीन व इतर अमायनो ऍसिड शेळीच्या शरीरात बनविले जातात.

3) सिस्टीन शेळीच्या शरीर बांधणीसाठी जे आवश्यक प्राणिजन्य प्रोटीन आहेत ते बनविण्यासाठी व त्यांचे स्ट्रक्चर कायम ठेवण्यामध्ये काम करत असते.

4) शरीरातील विशिष्ट अँटीऑक्सिडंट सोबत सिस्टीन काम करत असते. 

5) सिस्टीन त्वचा , नखे व केस या मध्ये महत्वाची भूमिका बजावतो.

6) कांदे व लसूण या मध्ये सिस्टीन उपलब्ध असते तसेच इतर तेल वर्गीय पिके या मध्ये देखील सिस्टीन उपलब्ध असते.

7) मेंढ्यामध्ये लोकर उत्पादन होण्यासाठी सिस्टीन ची विशेषत्वाने गरज असते.

8) सिस्टीन इतर मूलद्रव्यसोबत देखील शरीरात विविध जैवरासायनिक प्रक्रियेमध्ये काम करते. ज्यांच्यामध्ये सेलेनियम, झिंक व तांबे यांचा समावेश आहे.

- बाळू मोटे, बारामती, 9422512680.

Thursday, October 8, 2020

Threonine थ्रीओनाईन

 ४

Threonine थ्रीओनाईन

1) थ्रीओनाईन हे अमिनो आम्ल शेळीच्या शरीरात तयार होत नाही, चारा व खुराक घटकातून त्याचा पुरवठा करावा लागतो.
2) चेता संस्थेचे कार्य सुरळीत चालू राहण्यासाठी थ्रीओनाईन ची आवश्यकता असते.
3) शरीरातील फॉस्फोरिलेशन नावाच्या महत्वाच्या क्रियेत फॉस्फोरस आणि थ्रीओनाईन चा एकत्रित सहभाग असतो.
4) शरीरातील वेगवेगळे स्नायू व त्यांच्या योग्य वाढीसाठी, हालचालींसाठी थ्रीओनाईन आवश्यक असते.
5) विविध द्विदल वर्गीय पिकामध्ये थ्रीओनाईने असते, तसेच गहू व इतर एकदल पिकामध्ये देखील थ्रीओनाईने काही प्रमाणात उपलब्ध असते.
-बाळू मोटे, बारामती, 9422512680

Wednesday, October 7, 2020

Lysine लायसिन


Lysine लायसिन

1) लायसिन हे एक महत्वाचे आवश्यक अमायनो ऍसिड आहे. जे शेळीच्या शरीरात तयार होत नाही.
2) लायसिन चा शेळीच्या शरीरात महत्वाचा रोल आहे. रोगप्रतिकार शक्ती विशेषतः विषाणू विरोधात प्रतिकार शक्ती लायसिन मुळे प्राप्त होते.
3) लायसिन पासून प्राणिजन्य प्रथिने शेळीच्या शरीरात बनवली जातात.
4) लायसिन चा शरीरात बॅलन्स असेल तर ते अरजीनाईन नावाच्या दुसऱ्या अमायनो ऍसिड च्या दुष्परिणामपासून संरक्षण करते. दुसऱ्या शब्दात आहारात लायसिन व अरजीनाईन चा बॅलन्स असणे आवश्यक आहे.
5) सोयाबीन हा लायसिन चा स्रोत आहे. परंतु गहू व तांदूळ या मध्ये देखील काही प्रमाणात लायसिन उपलब्ध असते. ज्या वनस्पती मध्ये मोठ्या प्रमाणात क्रूड प्रोटीन असते त्यात लायसिन उपलब्ध असते असा एक ठोकताळा आहे.
6) पचन सुधारणा या विषयी लायसिन चे कार्य आहे असे काही संदर्भ मिळतात. लायसिन च्या उपलब्धतेमुळे पचन सुधारते व भूक लागते अस वाचनात आले.
7) केसांचे आरोग्य, तणाव मुक्ती, कातडीचे आरोग्य, रोगप्रतिकार शक्ती अश्या अनेक बाबी मध्ये लायसिन चा हातभार आहे.
8) कृत्रिम रित्या लायसिन चा पुरवठा करता येयू शकतो, जसे की काही mm मध्ये L लायसिन उपलब्ध असते.
- बाळू मोटे, बारामती, 9422512680

Tryptophan ट्रेप्टोफॅन

 २

ट्रेप्टोफॅन ( tryptophan )


1) ट्रेप्टोफॅन हे एक दुसरे महत्वाचे आवश्यक अमायनो ऍसिड आहे. जे शेळीच्या शरीरात तयार होत नाही.

2) ट्रेप्टोफॅन पासून इतर अमायनो ऍसिड किंवा व्हिटॅमिन्स शेळीच्या शरीरात तयार होतात जसे niacin/नियसीन म्हणजेच व्हिटॅमिन B3

3) ट्रेप्टोफॅन पासून malatonin मलेटॉनिन व सेरोटॉनिन seratonin हे घटक शरीरात तयार होतात. त्या दोघांचे शरीरात वेगवेगळी कार्य आहेत. अन्न ग्रहण, पुनरुत्पादन, रोगप्रतिकार शक्ती, तणाव दूर करणे इत्यादी बाबी ट्रेप्टोफॅन वर अवलंबून असतात

4) ट्रेप्टोफॅन हे शेळीच्या शरीरातील प्रथिने निर्मिती मध्ये महत्वाची भूमिका बजावत असते. 

5) द्विदल वर्गीय पिकामध्ये ट्रेप्टोफॅन असते, जसे सोयाबीन मध्ये ट्रेप्टोफॅन उपलब्ध आहे. मानवासाठी ट्रेप्टोफॅन चा चांगले स्रोत मांस, मासे व अंडी होय.

6) मानवात सेरोटॉनिन चा तणाव मुक्ती साठी, anti depression म्हणून उपयोग होतो त्यासाठी ट्रेप्टोफॅन ची अवशाक्त असते. म्हणूनच शेळीस देखील ट्रेस मधून बाहेर काढण्यासाठी ट्रेप्टोफॅन ची उपयोगिता तपासून पहावी लागेल. 

-बाळू मोटे, बारामती, 9422512680

Tuesday, October 6, 2020

methionine, मिथोनीन

 १

मिथेनॉईन 


1) शेळीच्या आहारातील हे एक आवश्यक अमायनो ऍसिड आहे. शेळी स्वतःच्या शरीरात मिथेनॉईन बनवू शकता नाही.

2) मिथेनॉइन हे एक साधारण असिडीक प्रकारचे अमिनो आम्ल म्हणजेच अमायनो ऍसिड आहे. त्याचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे L मिथेनॉइन आणि दुसरे म्हणजे D मिंथेनॉईन

3) मिथेनॉइन पासून इतर अमायनो ऍसिड शरीरात बनवली जातात जसे सिस्टीन हे अमायनो ऍसिड शेळीच्या शरीरात बनविले जाते.

4) मानवास मिथेनॉइन दुग्ध जन्य पदार्थ तसे मांस, मासे व अंडी यातून मुबलक प्रमाणात मिळते. परंतु शेळीस हेच डाळवर्गीय पिके व टेलवर्गीय पिकातून मुबलक प्रमाणात मिळते.

5) मिथेनॉइन बनण्यासाठी सल्फर म्हणजेच गंधकाची आवश्यकता असते. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास मिथेनॉइन हे गंधक घटक असलेले महत्वाचे अमिनो आम्ल आहे. डाळ वर्गीय पिके व तेलबिया याना त्यामुळेच गंधकाची शिफारस केली जाते. सिंगल सुपर फॉस्फेट हे खत भुईमूग पिकास वापरण्यास सांगितले जाते ते त्यामुळेच.

6) मिथेनॉइन शरीरात अनेक महत्वाची कामे करते. यकृत म्हणजेच लिव्हर चे कार्य सुरळीत चालण्यासाठी मिथेनॉइन आवश्यक आहे. मांस बनणे, शरीराची वाढ होणे, सल्फर चा पुरवठा होणे इत्यादी बाबी मिथेनॉइन मुळे शक्य होतात.

7) मिथेनॉइन कृत्रिम रित्या देखील बनवता येते. त्या मुळे ते काही mm मध्ये असल्याचे आपणास दिसून येते.

- बाळू मोटे, बारामती. 9422512680.

Sunday, August 11, 2019

गव्हाण

गव्हाण बनवताना खालील कि पॉईंट लक्षात घ्यावेत असे माझे मत आहे-

१) गव्हाणीत शेळी ग्रुमिंग करते ब्रावजींग नाही. तेंव्हा ग्रुमिंग चा विचार करून गव्हाण बनवावी, बरेच लोक ब्रावजींग ची बनवतात.
२) गव्हाण सलग असावी, तुकड्या तुकड्यात नको, स्वछता करायला व चारा टाकायला जास्त श्रम लागतात.
३) गव्हाणीचा पृष्ठभाग गुळगुळीत असावा.
४)दिवसातून किती वेळा चारा टाकणार याचा विचार करून तेवढ्या क्षमतेपेक्षा 20 टक्के जास्त क्षमतेची गव्हाण बनवावी म्हणजे शेळीने चारा उधळला तरी तो संदनार नाही.
५) गव्हाणीत लेंडी पडू नये, अशी रचना असावी. शक्यतो शेळी गव्हाणीला स्वतःचे अंग घासत तेंव्हा लेंड्या गव्हाणीत पडतात.
६) एका शेळीला रनिंग 2 फूट तरी किमान गव्हाण असावी. म्हणजे मारामारी वर नियंत्रण मिळवण्यास काही प्रमाणात मदत होते.
७) गव्हाण मजबूत असावी, शेळीचा धक्का लागून पलटी होऊ नये.
८) पत्रा वापरणार असाल तर gi वापरावा, झिंक कोटेड किंवा ms वापरू नये. किंवा कलर कोटेड वापरू नये.
९) सिमेंट ची बनवणार असाल तर ज्या बाजूने शेळी तोंड घालते त्या बाजूची भिंत हि 1 इंच असायला हवी, जे वीट बांधकामात शक्य नसते. किमान 3 इंच पर्यंतत ठेवता येईल का ते पहावे.
९) गव्हाणीला 1 इंच उत्तर फार 10 फुटास द्यावा म्हणजे पाणी बाहेर निघून जाईल.
10) जमिनीच्या उतारावर गव्हाणीचा उत्तर ठेवावा म्हणजे सर्व ठिकाणी समान उंची राहील
🙏
बाळू मोटे बारामती, 9422512680

२२ मार्च 2019

गेल्या वर्षी बहुतेक हेच दिवस होते, आमचा वाडा म्हणजे मेंढरं कोतुळ च्या पुढे एक छोट गाव आहे... पडाळणे.

तेथे 2 मेंढ्याना सर्प दंश झाले... आईने मला रात्री 11 वाजता फोन केला... त्या दोन्ही मेंढ्या एका शेतकर्याच्या गोठ्यात आईने ठेवल्या कारण त्यानि अंथरून धरले होते... जगतील अशी अशा नव्हती.... त्या जागी मी असतो तर मी त्या जगणार नाहीत असे म्हणून त्यांना जागीच सोडून निघून गेलो असतो.

आईने फोन केला... मला संगीतले कि मेंढ्याना असा असा त्रास होतोय, बहुतेक साप चावला असेल.... मी ऍट्रॉपीन इंजेक्शन टोचलाय.... आता काय करू....

तो पर्यंत आईने कधीही मेंढ्याना सालइन लावली नव्हती....
दुसऱ्या दिवशी आईने मेडिकल मधून फोन केला.मी फोन वरून औषधे व सलाईन सांगितली.... मेंढ्या पाशी गेल्यावर मी आईला फोन वरून सलाईन कशी लावायची हे सांगितले... आईने बरेच प्रय्तब करून सलाईन लावली, मी सांगितलेली औषधे सलाईन मधून सोडली...

3 दिवस ट्रीटमेंट केल्यानंतर त्या 2नही मेंढ्या उभ्या राहायला, चारा खाऊ लागल्या....

अश्या अशिक्षित (अडाणी नव्हे) माणसाना मी मानतो.. त्यांचा आदर करतो... त्यांना गुरुजन मानतो...

पण जे 4-5 वर्षापासूनऊन अर्ध बंदीअस्त... फिरस्ती शेळी पालन करतात... आणि स्वतःला लय अनुभवाची मिजाशी करून दुसर्यांना नावं ठेवतात... त्या लक्ष्मीकांत बेर्डे च्या अर्धवट रावांना माझा लांबूनच प्रणाम... तुमच्या ज्ञानाने.... माझे हात कधीही यशपर्यत पोहचू शकणार नाहीत.... याची मला जाणीव आहे...

लेंड्या झाडायला शिका

1999साली लोक माणसांचे जे डॉ आहेत, त्यांना मानत नसत...
देव देवस्की, अंगारे धुपारे, गंडे दोरे, देवरुषी वैगरे जिनसना मानायचे...

तेंव्हा जर कोणी सांगितले कि पेशंटला डॉक्टर कडे घेऊन चला....
तेंव्हाही अनुभवी लोकं अक्षर शहा वेड्यात काढायचे....
डॉक्टर ला काय कळतं असं म्हणायचे...
काळ किती बदलला....आज अडाणी माणूस, ज्यास पूर्वापार ज्ञानाचा मोठा अभिमान आहे तो... साधी सर्दी झाली तरी लागेसाच डोंक्टर कडे पाळतो.... सिफिक्झिम वर भागात नाही... मग स्वतःच सेफोडोक्झिम मागतो....

1995 साली.. देशी गाई कोणी बंदिस्त करत नव्हते... गुराखी गाया घेऊन कुरणात चारायला घेऊन जात असे.... तेंव्हा त्या लोकांचा किती दांडगा अनुभव होता... तो धंदा मोडायला नव्हता पाहिजे.... 4 पत्र्याचा गोठा बांधून त्यात 10 गाई म्हैशी ठेवणारे दुग्ध व्यवसाय करणारे.... त्यांचे साठी आहार शास्त्राचा अभ्यास करणारे ठार वेडे आहेत... पूर्वीच्या दंडग्या माणसांचा अनुभव ते विचारात घेत नाहीत... अरेरे... हि केविलवाणी बाब आहे....

धनगर मंडळी गावो गावी शेळ्या मेंढ्या घेऊन भटकंती करतात.... त्यांचा अनुभव बंदिस्त वाले विचारात घेत नाहीत... वाईट बाब आहे... आहार शास्त्र शिकून काय करायचंए... या लोकांचा किंवा अर्ध बंदिस्त वाल्यांचा अनुभव शिरसावंध मानला पाहिजे...
अविर्भाव खूप मोठा असतो... फिरस्ती किंवा अर्ध बंदिस्त वल्याना असे वाटते कि त्यांना शेळीच्या नाकाच्या शेंड्यापासून शेपूटच्या गोंड्या पर्यंत सगळे काही माहित आहे.. पण शास्त्र सांगणारं काही आपल्याला भाव देत नाहीत...
त्यांना वाटतं ते अनुभवांनी शेळीचं आहार शास्त्र जाणतात... पुस्तक वाचून कोठे ते शिकता येतं का..?
वास्तविक फिरस्ती व अर्ध वंदिस्त शेळ्यना त्यांचे स्वतःचे आहार शास्त्र माहित असते... मालकाला नाही... तिच्याकडे तेवढा चॉईस असतो... ती फिरसत्य मालकाला विचारत नाही कि हा चारा खाऊ कि तो चारा खाऊ.... ती तिच्या आहार शास्त्राप्रमाणे खात असते...

शेळीला बंदिस्त केल्यावरआर तिला तिचे उपजत आहार शास्त्र उपयोगात आणता येत नाही...
पण मालकाला वाटते कि मला शेळीचं सगळं कळतं... पुस्तक वाचायची गरज नाही....
ज्या ठिकाणी शेळीला चोरीस नाही... अश्या बंदिस्त वातावरणात शेळी स्वतःचे उपजत आहार शास्त्र कसे काय वापरू शकेल...?

अडाणी साधी माणसं... खूप तरबेज असतात... ती शेळीशी बोलू शकतात... आणि शेळीला सांगू शकतात... कि बाई... मी देईन तेच खा... मी लावीन तोच बोकड तुला योग्य आहे.. मी तुझं सगळं जाणतो... पण आता तुझ्या हाऊस मौज मी पुरवू शकत नाही...
पुस्तकी वल्याना हे जमणार नाही...
आम्हाला किचकट आहार शास्त्र नकोच...
माझ्याकडे 10 पिल्लं आहेत.. सनेर सर तुम्ही सांगा तुमचंया आहार शास्त्र प्रेमआने मी त्यांना काय खाऊ घालू... आणि मला 15 रु दर महिन्याला 5 किलो वजन वाढ कशी मिळेल... नाही मिळाली तर तुमचं आहार शास्त्र फेल आहे... तुम्हाला मेथी दाण्याचंइ तासिर माहित आहे का.... माहित नाही तर मग तुम्ही कसले तञ्.... तुम्हाला उसाची तासिर माहित आहे का... नाही... मग तुम्ही कसले तञ्... तुम्ही कानामागून  येऊन तञ् कसे होता... खरे तञ् तर आम्ही आहोत.... आम्ही गर्भपात रोकु शकतो.... गर्भपात होण्या अगोदर आम्हाला कळतं..
आम्ही तर शेळीशी थेट बोलू शकतो....
तज्ञानो लेंड्या झाडायला शिका... मग आम्हाला उपदेश करा..
- बाळू मोटे, बारामती...
9422512680.

रोल मोडेल

मी नोकरी सोडून शेती करायला लागलो, 2014 साली, तेंव्हा माझे चुलत मामा म, माझ्या आईला म्हणाले कि 'तुझ्या लेकाला माज आलाय, गप आपली नोकरी करायची सोडून हिकडं आलंय खोंड्या माळात'.

गेले 3 ते 4 वर्ष मी येथे संघर्ष करत आहे...माझ्याकडे माझा पारंपरिक व्यवसायातील, माझ्या वडवडिलांचा व माझा देखील प्रदीर्घ अनुभव आहे, तरीही मला बऱ्याच ठेचा खाव्या लागल्या....

आताशी कुठे बरे चालले आहे....
मी एवढं शिकून सावरून, शास्त्र वैगरे जाणत असून, हाताशी इंटरनेट, पुस्तके माहिती असून मला खूप संघर्ष करावा लागला...

हे एका बाजूला आहे...

माझ्या गावात अनेक मूल 10 वी नापास, 12 वि नापास वैगरे आहेत....आज त्यांच्याकडे ज्ञान नाही, व्यवसाय करण्याची अक्कल नाही, पैसा नाही... नवीन कोणता व्यवसाय करावा कसा करावा हे त्यांना माहित नाही...

तेंव्हा माझ्या त्या चुलत मामास मी सांगितले कि...
हा व्यवसाय मी नेटाने करणार आहे... मी यशस्वी झालो तर मी इथल्या तरुण मुलांसाठी रोल मॉडेल ठरेल....
मी अयशस्वी झालो तर मला कोठेही शिक्षणाच्या जोरावर 4 पैशाची नोकरी मिळवेन....

या तरुण पोरांना शास्त्र समजत नाही, म्हणूनच त्यांनी शिक्षण सोडलेलं असतं.... अश्या तरुण मुलांना.. शास्त्राची आवश्यकता नाही... त्यांना रोल मोडेल हवीत.. जे त्यांचा थेट अनुकरण करू शकतील...

आज माझे नातेवाईक जेंव्हा मेंढ्याना औषध खरेदी करायचे असते तेंव्हा ते मेडिकल मध्ये जाऊन मला फोन करतात, आणि मी संगील ती औषधे खरेदी करतात.

हा कसला बदल आहे...

हा बदल कसा शक्य झाला...

माझ्या परिचयाचे 3घे चौघे आहेत जे शेळी पालन सुरु करू इच्छितात... थोड्या फार प्रमाणात सुरु पण केले आहे... ते आज माझ्याकडे आशेने पाहतात.... पूर्वी ते कुचेष्टेने पाहत होते....

हा बदल कसा शक्य झाला...
माझ्याकडे क्षमता आहे... नवीन ज्ञान घेण्याची, शिकण्याची, प्रयोग करण्याची आणि महत्वाचं म्हणजे दुसऱ्याला शिकवण्याची, सांगण्याची...

मीच जर या क्षमतेचा उपयोग केला नाही... पारंपरिक ज्ञानाला कवटाळून बसलो.... तर मी (किंवा कोणीही) रोल मॉडेल बनु शकेल काय...?
हा माझा प्रशन आहे...

मी बंदूक घेऊन सीमेवर जाऊन लढू शकत नाही...

मी समाज सेवा कोणत्या प्रकारे करू शकतो...

ग्रामीण भागात अश्या नवीन तरुणास गरज आहे रोल मॉडेल ची....

हि रोल मॉडेल कशाचीही असू शकतात...

शेळी पालन.. दुघड व्यवाय, कुकुट पालन...
असे अनेक..

हिरोल मॉडेल काशी विकसित होतील...
ज्ञानाशिवाय विकासइट होतील काय....

कि केवळ पारंपरिक ज्ञानाचं आपल्याला यातून मार्ग दाखवू शकेल, तेवढाच एक आधारस्तंभ आहे का?

बाळू मोटे- बारामती- 9422512680

मला लाज वाटते...!

मला लाज वाटते...!

मी शेतकरी असल्याची...!

ज्यांना आपण अडाणी समजतो, जे समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आडरणात राहतात असे धनगर आपल्या पेक्षा जास्त प्रयोरिटी आपल्या व्यवसायाला देतात- हे पाहून मला लाज वाटते..!

जेंव्हा 2 शेतकरी एकत्र भेटतात तेंव्हा ते कधीच शेतीच्या गप्पा मारत नाहीत... त्यांच्या गप्पांचा मुख्य मुद्दा शेती असत नाही.

पण
जेंव्हा 2 धनगर बंधू भेटतात तेंव्हा त्यांचा पहिला प्रश्न असतो-
'कशी काय मेंढरं-शेर्ड बरी हायेत का?'

त्यांच्या चर्चेची प्रयोरिटी हा त्यांचा व्यवसाय असतो.

ज्यांना आपण अडाणी समजतो ती लोक व्यवसायाची चर्चा करतात, कुठे कसा चारा आहे, कुठे कोणता रोग आला, त्यावर कोणतं औषध पाजलं, कुणाची मेंढरं चांगली आहेत, कुणाची खराब आहेत... कोण कोणता गावात राहत, त्या गावाची बसक कशी आहे, रात काय आहे? पाण्याला देवणं आहे का???? किती तरी रोजच्या व्यवसायतले प्रश्न ते जाणून घेतात.

ते कधीच क्रिकेट विषयी गप्पा मारत नाही, भारत पाकिस्तान च्या गप्पा मारत नाही, शरद- मोदी च्या गप्पा मारत नाहीत...

व्यावसायिकता त्यांचेकडून शिकायला हवी...

मी शिकून शेतकरी झालो- शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करतो... म्हणून मला लाज वाटते.

धनगर मंडळी भले शास्त्री चर्चा करत नसतील- पण त्यांची प्रयोरिटी, त्यांचा व्यवसाय असतो... शेतकऱ्यांचं अस का नाही...

बरेच जण सांगतात... शेळी पालन हा सोपा व्यवसाय आहे- तुम्ही हे dm cp tdn इनब्रीड आऊट ब्रिडींग वैगरे सांगून अवघड बनवत आहात...

शेती व शेती पूरक व्यवसाय यात जितक्या शास्त्रीय ज्ञानाची आवश्यकता आहे तितके शास्त्रीय ज्ञान मला नाही वाटत दुसऱ्या कोणत्या व्यवसायाला लागत असेल...

जितकं खोलवर ज्ञान घेऊ तितकं कमीच आहे...


[In reply to शेळी पालन चॅनेल]
मी जेंव्हा शेळी पालनास सुरवात केली तेंव्हा मला सर्वात जास्त लोक शेतकरी आणि सुशिक्षित भेटले ज्यांनी मला हा व्यवसाय बंद करून कुठे तरी नोकरी कारणयाचा सल्ला दिला...

पण मला बरेच अडाणी धनगर नातेवाईक भेटले ज्यांनी मला सांगितलं बाबा तू दीड वर्ष शेळ्या सांभाळल्या तर पुढं टिकशील, हयातनं निसर्गतशील.... या लोकांनी मला नोकरी करण्याचा सालया दिला नाही.... हि लोक म्हणलि- 50 करण्यापेक्षा पहिल्यांदा 10 च शेळ्या चांगलंया कर... मंग 50 कर....
मला मी हि अडाणी लोकच गुरू करून घेतली आहेत.... मला जेंव्हा अडचण येते तेंव्हाया मी पाहिलंयानद या लोकांनाचह विचारतो...